यावल येथे दहावीच्या / यावल येथे दहावीच्या परीक्षा केंद्रात हिंदीचा पेपर लिहित होता डमी स्टूडेंट, ब्लॉक सुपरवायझरने पकडले रंगेहात

  • यावल येथील परीक्षा केंद्रात आढळला दहावीचा डमी विद्यार्थी
  • परीक्षा केंद्रात कॉपी बहाद्दरांचा सुळसुळात, केंद्रप्रमुख निष्क्रिय

प्रतिनिधी

Mar 07,2019 06:37:00 PM IST

यावल- नगरपरिषद संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असताना डमी विद्यार्थ्याला ब्लॉक सुपरवायझरने रंगेहात पकडले आहे. संजय कोळी असे डमी विद्यार्थ्याचे नाव आहे. ब्लॉक क्रमांक 10 मध्ये संजय हा मूळ मुलगा (प्रभाकर कोळी) याच्या क्रमांकावर बसून हिंदीचा पेपर सोडवित होता.

दरम्यान, परीक्षा संपल्यानंतर दुपारी परीक्षा केंद्र प्रमुख मोरे यांनी डमी परीक्षार्थीविरुद्ध यावल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

गुरुवारी सकाळी अकरा वाजता पेपर सुरू झाला. आरोपी ब्लॉक क्रमांक 10 मध्ये हिंदी विषयाचा पेपर सोडवित होता. ही बाब ब्लॉक सुपरवायझर यांच्या निदर्शनास आली. आरोपीला केंद्रप्रमुख यांच्या कार्यालयात बसवून ठेवण्यात आले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या गंभीर प्रकारामुळे परीक्षा केंद्रात एकच खळबळ उडाली.

परीक्षा केंद्रात कॉपी बहाद्दरांचा सुळसुळात..

परीक्षा केंद्रात कॉफी पुरवणार्‍यांचा सुळसुळात झाला आहे.चक्क ते सुपरवायझरसारखे परीक्षा केंद्रात बिनधास्त फिरताना दिसतात. परंतु त्यांच्या कोणताही प्रतिबंध घातला जात नाही. त्यामुळे सानेगुरुजी विद्यालयाचे कामकाजावर शालेय समितीचे नियंत्रण आहे किंवा नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. काही सदस्यांच्या हितसंबंधांमुळे कॉपी जोरात सुरू असल्याचे यावल शहरात सर्वत्र बोलले जात आहे.

X