आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांचे बोगस इन्शुरन्स, दोन एजंटसह तिघे अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वाहनांचे बोगस इन्शुरन्स प्रकरणात पंचवटी पोलिसांनी आणखी दोन एजंट व वाहनमालकाला अटक केली. मंगळवारी (दि. ४) सकाळी ही कारवाई केली. याप्रकरणी आठ दिवसांपूर्वी तीन आरटीओ एजंटला अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत मोठी टोळीच पोलिसांनी उघडकीस आणली. विशेष म्हणजे आरटीओमध्ये शेकडो वाहनांचे बोगस इन्शुरन्स व फिटनेस प्रमाणपत्र आणि वाहन परवाने काढल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.


असंख्य इन्शुरन्स असण्याची शक्यता 
संशयितांकडे आढळून आलेल्या बोगस कागदपत्र, शिक्के, विविध शाळांच्या मुख्याध्यापकांचे शिक्के, तसेच दहावी, बारावीचे गुणपत्रकांच्या झेरॉक्स आढळून आल्या आहेत. आरटीओमध्ये असे अनेक एजंट बोगस कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करत असल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात आणखी नावे निष्पन्न होणार आहेत. - मधुकर कड, वरिष्ठ निरीक्षक, पंचवटी 

बातम्या आणखी आहेत...