आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशातील व्यक्ती, मजुरांच्या नावे बोगस कर्ज; दोघांना अटक, मुख्य आरोपी फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - परिवर्तन मल्टिस्टेट बँक व परिवर्तन पतसंस्थेच्या माध्यमातून शेकडो ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या माजलगाव  येथील विजय अलझेंडेचा नवा कारनामा पोलिस तपासात उघड झाला आहे. बँक व पतसंस्थेच्या माध्यमातून देण्यात आलेले कर्ज ज्या लोकांच्या नावे वाटप केले त्या लोकांना प्रत्यक्षात कर्जच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत अशी २० प्रकरणे उघड झाली असून आता सर्व कर्जदारांची पडताळणी आर्थिक गुन्हे शाखेने सुरू केली आहे.

 
माजलगाव शहरातील विजय अलझेंडे याने परिवर्तन पतसंस्था व परिवर्तन मल्टिस्टेट बँकेच्या माध्यमातून मुदत ठेवींवर ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. अल्पावधीतच बँकेच्या सात शाखाही सुरू केल्या हाेत्या. सुरुवातीला काही ठेवीदारांना ज्यादा व्याजदराने परतावा मिळाला. मात्र, नंतर हळूहळू एक एक शाखा बंद पडत गेली आणि शेवटी मुख्य शाखाही बंद पडली. अडकलेल्या ठेवींसाठी ठेवीदारांनी खेटे मारूनही त्यांना पैसे परत मिळाले नाही. यामुळे ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली. बीड, माजलगाव शहर, माजलगाव ग्रामीण या पोलिस ठाण्यांमध्ये एकूण सात गुन्हे या प्रकरणात नोंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत दोन जणांना अटक झाली असली तरी मुख्य आरोपी असलेला अध्यक्ष विजय अलझेंडे अद्यापही फरार आहे.  


बनावट कर्जाचेही प्रकरण   

ठेवीदारांच्या फसवणुकीनंतर आता बनावट कर्जांचे नवे प्रकरण समोर आले आहे. ज्या लोकांनी कधी पतसंस्था व मल्टिस्टेटकडे कर्जाची मागणीच केली नाही त्यांच्या नावे कर्ज उचलण्यात आले आहे. तपासादरम्यान हा प्रकार समोर आला. माजलगाव शहराजवळील गावांच्या  नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत भाटवडगाव व चाळकवस्ती येथील २० जणांचे जबाब नोंदवले आहेत.  

 

परदेशातील व्यक्ती, शेतमजुरांचा समावेश    
कर्ज घेतलेल्यांपैकी बहुतांश शेतकरी, शेतमजूर आहेत. एका महिलेच्या नावेही कर्ज दाखवले ,ही महिला पतीसोबत  परदेशात वास्तव्यास असते. ती कधी कर्ज मागण्यासाठी आलीच नाही. तिच्या नावे कर्ज उचलल. बोगस कर्जाच्या रकमा बहुतांश ५० हजार आहेत.

बातम्या आणखी आहेत...