आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये तोतया तिकीट तपासणीस पोलिसांच्या ताब्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- रविवारी नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये एका तोतया तिकीट तपासणीसाला पकडण्यात आले. तो प्रवाशांची तिकिटे तपासत होता. त्याच गाडीत ड्युटीवर असलेले छोटूराम मीना, टी टी ई यांनी त्याची विचारपूस केली तेव्हा तो तोतया असल्याचे लक्षात येताच रेल्वे पोलिसांना कळवण्यात आले. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या (जी.आर. पी .) स्वाधीन केले.

पुढील तपास जी.आर.पी. औरंगाबाद करत आहेत.

 

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटूराम मीना यांना त्याच गाडीत ड्युटीवर असलेले शिवा , रमेश आणि मुकेश चौधरी या इतर तपासणीसांनी तसेच औरंगाबाद येथील मोहन आणि प्रभास उपाध्याय यांनी मदत केली. नांदेड येथील नियंत्रण कक्षातील व्हिन्सेंट यांनी सर्व घटनेत महत्वाचे योगदान दिले आणि पोलिसांना वेळेवर तिथे पोहोचवले.