Home | International | Other Country | bohing paid to air india 50 cr for delay dreamliner flight.

एयर इंडिया होणार मालामाल

agency | Update - May 27, 2011, 01:41 PM IST

जगातील सर्वांत मोठी हवाई जहाज अमेरिकन कंपनी बोइंगने भारतातील हवाई सरकारी कंपनी एयर इंडिया कंपनीला वेळेत विमाने पुरवठा न केल्याने कराराच्या अटीनुसार सुमारे ५0 कोटी डॉलर एवढी रक्कम दंडाच्या स्वरुपात देणार आहे.

 • bohing paid to air india 50 cr for delay dreamliner flight.

  नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी हवाई जहाज अमेरिकन कंपनी बोइंगने भारतातील हवाई सरकारी कंपनी एयर इंडिया कंपनीला वेळेत विमाने पुरवठा न केल्याने कराराच्या अटीनुसार सुमारे ५0 कोटी डॉलर एवढी रक्कम दंडाच्या स्वरुपात देणार आहे. त्यामुळे तोट्यात चालत असलेल्या एयर इंडियाला थोड्याफार प्र्रमाणात का होईना मालामाल होता येणार आहे.

  एयर इंडियाने बोइंग कंपनीला २६ मध्ये आधुनिक ड्रीमलायनर (बी-७८७) विमानाची मागणी केली होती. करारानुसार २७ विमानेे सप्टेंबर २00८मध्ये
  देणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणीमुळे बोइंगला शक्य झाले नाही. एयर इंडिया सध्या तोट्यात असून कंपनीकडे विमानाची संख्या फारच कमी आहे.
  त्यामुळे अनेक देशात कंपनीला सेवा पुरवणे अश्क्य झाले आहे. यामुळे कंपनीवर नामुष्कीची वेळ आली असून कंपनीच्या सेवेवर मोठा परणिाम होत आहे. एयर इंडियाने बोईंगला सुरवातीला मोठी अनामत रक्कम दिली होती. मात्र वेळेत पुरवठा न केल्याने कंपनीने एयर इंडियाला ५0 कोटी डॉलर म्हणजेच सुमारे २२६ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. मात्र एयर इंडियाने किमान १00 कोटी डॉलर मिळावेत, अशी मागणी केली आहे. ड्रीमलायनर हे विमान खूप महाग असले तरी कमी इंधन लागत असल्याने त्याची उपयुक्तता मोठी आहे. ड्रीमलायनरच्या एका विमानाची किंमत सुमारे १४ ते २0 कोटी
  डॉलरपर्यंत आहेत.Trending