Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | boil vegetables eating health benefits in marathi

कोणती भाजी उकडून खाल्ल्याने कोणता होतो आरोग्य लाभ, जाणून घ्या

हेल्थ डेस्क | Update - Aug 04, 2018, 05:38 PM IST

काही भाज्या उकडून खाल्ल्याने फक्त बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत, तर किडनीपासून लठ्ठपणापर्यंतच्या अनेक समस्यांपासून बचाव होतो

 • boil vegetables eating health benefits in marathi

  काही भाज्या उकडून खाल्ल्याने फक्त बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत, तर किडनीपासून लठ्ठपणापर्यंतच्या अनेक समस्यांपासून बचाव होतो. आज आम्ही भाज्या उकडून खाण्याचे फायदे सांगत आहोत.... (रिसर्च : इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्स अँड न्यूट्रिशन)


  काय मिळेल फायदा?
  भाज्या उकडताना यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा जवसाचे तेल मिसळल्याने यामधील जीवनसत्त्वे कायम राहतात आणि त्याचा शरीराला चांगला फायदा मिळतो.


  या गोष्टींकडे ठेवा लक्ष
  - भाज्या उकळताना पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. यामुळे भाज्यांमधील वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन नष्ट होत नाही.
  - भाज्यांचे तुकडे मोठेच राहू द्या आणि उकळा. अशा प्रकारे कापल्याने भाज्यांमधील न्यूट्रियंट्स टिकून राहतात.


  1. पालक
  हलके उकडल्याने यामधील ऑक्लेजिक अॅसिड लेव्हल कमी होते. यामुळे किडनीचे आजार होत नाहीत.


  2. बटाटे
  बटाट्यांमधील कार्बोहायड्रेट हे उकडून खाल्ल्याने कमी होतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते.


  3. पत्ताकोबी
  हे उकडल्याने यामधील टेपवर्म आणि हुकवर्मसारखे बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे वजन नियंत्रित राहते.


  4. सिमला मिरची
  उकडून खाल्ल्याने यामधील बीटा केरोटिनचे पूर्णपणे विघटन होते. यामुळे डोळे चांगले राहतात.


  5. बीन्स
  हे उकडून खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

 • boil vegetables eating health benefits in marathi

  6. मशरूम 
  उकडल्याने यामधील विषारी पदार्थ नष्ट होतात. यामुळे हाडे मजबूत होतात. 

 • boil vegetables eating health benefits in marathi

  7. टोमॅटो : उकडून खाल्ल्याने टोमॅटोमधील लायकोपिनची पातळी वाढते. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते. हृदयाच्या समस्यांपासून बचाव होतो. 

Trending