आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिशिंगणापूरला जाताना पुण्यातील भाविकांच्या वाहनास अपघात; २ ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन शनैश्वराच्या दर्शनासाठी शनिशिंगणापूरकडे चाललेली पुणे जिल्ह्यातील भाविकांची बोलेरो मालट्रकवर आदळल्याने चालकासह दोघे ठार, तर चार मुलींसह ६ जण गंभीर जखमी झाल्या.  रविवारी झालेल्या या अपघातामुळे नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती. 
राहुरीजवळील शनिशिंगणापूर फाट्याजवळ रविवारी दुपारी ेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. पुणे जिल्ह्यातील ८ भाविक बोलेरोतून शिर्डीनंतर  शनिशिंगणापूरला चालले होते. शनिशिंगणापूर फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो दुभाजक तोडून मालट्रकवर आदळली. बोलेरोच्या समोरचा भाग चेपला गेल्याने चालक व एका भाविकाचा मृत्यू झाला. गंभीर जखमींमध्ये एक अकरा वर्षाची, तर पंधरा ते सतरा वयोगटातील ३ मुलींचा समावेश आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ठार, तसेच गंभीर जखमी झालेल्या भाविकांची ओळख पटू शकली नव्हती.