Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Bolero hit two teachers who had gone to Morning Walk, two people killed

मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षकांना बोलेरोची धडक, दोन जण ठार

प्रतिनिधी | Update - Nov 09, 2018, 08:53 AM IST

छिंदवाड्याहून माळेगावकडे जात असलेल्या एका बोलेरो वाहनाने तिघांनाही मागून धडक मारली

  • Bolero hit two teachers who had gone to Morning Walk, two people killed

    नागपूर - माॅर्निंग वाॅकला फिरायला गेलेले २ शिक्षक अपघातात ठार झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे घडली. नागोराव बनसिंगे (४१) व हेमंत लाडे (५२) हे शिक्षक दुर्गेश्वर चौधरी यांच्यासह बुधवारी सकाळी फिरायला निघाले. छिंदवाड्याहून माळेगावकडे जात असलेल्या एका बोलेरो वाहनाने तिघांनाही मागून धडक मारली. यात दोघे ठार, तर चौधरी जखमी झाले.चालक दिलीप वाघाडाला अटक झाली अाहे. मृत व जखमी हे सर्व शिक्षक आहेत. दिवाळीच्या सुटीनिमित्त हे तिघेही एकत्र आले होते.

    त्यांनी काही बेत आखले होते. एरवी कामात व्यग्र असल्याने एकमेकांची भेट होत नसल्याने त्यांनी एकत्र येत सकाळी साडेपाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी जाण्याचे ठरवले आणि हा अपघात घडला. घटनास्थळावरून काही अंतरावरच पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेले वाहन जप्त केले आहे.

Trending