आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी दोनदा झाला बलात्कार, नराधमांनी घर जाळले; मोठी होऊन पीडितांना न्याय मिळवून देतेय ही महिला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लापाझ - बोलिव्हियात राहणारी एक 32 वर्षीय महिला लैंगिक शोषण झालेल्या लहानग्यांना न्याय मिळवून देते. 'अ ब्रिज ऑफ होप' असे तिच्या संघटनेचे नाव आहे. बोलिव्हियात देशभर लैंगिक शोषण झालेल्यांपैकी फक्त 2 टक्के पीडितांना न्याय मिळाला आहे. त्यापैकी 96 टक्के पीडितांना याच संघटनेने मदत केली. महिला आणि बालकांना शोषणाविरोधात लढण्याचे बळ देणारी ही महिला एकेकाळी आत्महत्या करणार होती. लहान असताना तिच्यावर दोनदा बलात्कार झाला होता. पण, कालांतराने तिने आपले विचार बदलून आपल्यासारख्या इतरांची मदत करण्याचा निर्णय घेतला. इतरांसाठी लढा उभारताना समाजकंटक आणि बलात्काऱ्यांनी तिचे घर सुद्धा जाळले होते. तरीही निर्भीडपणे आजही ती लोकांची मदत करत आहे.


वयाच्या 17 व्या वर्षी बनवली संघटना
ब्रीसा डे अँगुलो 15 वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला होता. तिच्या कुटुंबियांना याची जाणीव होती की तिच्यासोबत काही वाइट घडले. परंतु, तो अत्याचार कुटुंबातील सदस्यानेच केला याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यावेळी ती डिप्रेशनमध्ये होती आणि आत्महत्या करण्याचा विचारही केला होता. वयाच्या 16 व्या वर्षी पुन्हा अत्याचार झाल्यानंतर तिने पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती. परंतु, कायदेशीर प्रक्रियेच्या गोंधळाने तिला न्याय मिळाला नाही. देशभर आपल्यासारख्या कित्येक महिला आणि लहानगे अशाच पद्धतीने न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत याची जाणीव तिला झाली. तेव्हापासूनच तिने अशा लोकांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प घेतला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी तिने तिने बलात्कार पीडित लहानग्यांसाठी देशातील पहिली संघटना 'अ ब्रिज ऑफ होप' ची स्थापना केली.


कुटुंबियांनीही दाबला आवाज
ब्रीसाने सांगितल्याप्रमाणे, तिने आपल्यासह इतरांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला तेव्हा कुटुंबातूनच तिला रोखण्याचा प्रयत्न झाला. समाजकंटक आणि आरोपींनी तर तिच्या घराला आग लावली. तीही एकदा नव्हे, तर दोनवेळा... अनेकदा तिच्यावर जीवघेणे हल्ले सुद्धा झाला. गर्दीत असताना तिच्यावर दगडफेक देखील करण्यात आली. परंतु, ती कुणालाही घाबरली नाही. ब्रीसा सांगते, जेव्हा तिने आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची तक्रार दाखल केली, तेव्हा कोर्टात फक्त चक्राच माराव्या लागल्या. तीन सुनावण्या झाल्यानंतर तिचे प्रकरण घटनात्मक पीठाकडे गेले. तेथे सुनावणीची तारीख आली तोपर्यंत आरोपीने देश सोडला होता.


स्टाफपैकी 65 टक्के बलात्कार पीडित...
ब्रीसाने गेल्या 14 वर्षांत लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या 500 हून अधिक पीडितांसाठी कायदेशीर संघर्ष केला. सोबतच, त्यापैकी 96 टक्के लोकांना न्याय देखील मिळवून दिला. देशभर होणाऱ्या अत्याचारांमध्ये न्याय मिळण्याचे प्रमाण फक्त 2 टक्के आहे. त्यातही सर्वाधिक खटले ब्रीसाने लढले आहेत. तिच्या लीगल टीममध्ये काम करणाऱ्यांपैकी 65 टक्के स्टाफ स्वतः पीडित आहे.


बोलिव्हियात 10 महिलांपैकी 6 जणींवर अत्याचार
दक्षिण अमेरिकन देशांमध्ये महिला विरोधी अत्याचारांच्या बाबतीत बोलिव्हियाची आकडेवारी सर्वात वाइट आहे. अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार, दर 10 महिलांपैकी 6 महिला शारीरिक किंवा लैंगिक शोषणाच्या बळी ठरल्या आहेत. अशा महिलांना केवळ कायदेशीर लढाच नव्हे, तर मानसोपचार तज्ञांच्या माध्यमातून त्यांची काउन्सेलिंग करणे, त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढणे आणि रोजगार उपलब्ध करून देणे अशी कामे सुद्धा ब्रीसाच्या संस्थेकडून केली जातात.

 

बातम्या आणखी आहेत...