आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर समोर आला हृतिक-टायगरच्या बहुचर्चित चित्रपटाचा Teaser, परदेशात एकमेकांशी भिडताना दिसले Action Heroes

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या 'वॉर' या आगामी चित्रपटाचा ऑफिशिअल टीझर नुसताच रिलीज झाला. प्रेक्षकांना या चित्रपटात अॅक्शनचा थरार अनुभवायला मिळणार आहे. यशराज फिल्मसने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर चित्रपटाचा टीझर पोस्ट करून ही माहिती दिली. 

 

हृतिक आणि टायरग पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रीन 

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित वॉर चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च करण्याच आला. हृतिक आणि टायगर दोघेही प्रथमच एकत्र काम करत आहेत. यामुळे दोघांच्याही चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात हृतिक आणि टायगर दोघांच्या महत्वाच्या भूमिका असून दोघेही एकमेकांविरोधात असल्याचे दिसत आहे. टीझरमध्ये वानी कपूरचा बिकनी अंदाज पाहायला मिळाला. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव 'फायटर्स' ठेवण्यात येणार असे बोलले जात होते. पण निर्मात्यांना या अफवांना नकार दिला 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...