आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

150 कोटी रुपयांचे 3 आलिशान बंगले, गावात वडिलोपार्जित शेती, 22 फ्लॅट्‍सचा मालक आहे आमिर खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अर्थात आमिर खान आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. 14 मार्च, 1965 रोजी मुंबईत जन्मलेला आमिर खान आज बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अॅक्टर्स पैकी एक आहे. आमिर खान एखादी फिल्म साईन करताना मानधनापेक्षा प्रॉफिट शेअरिंगला प्राधान्य देतो.

 

रिपोर्ट्सनुसार, आमिर खानचा एखाद्या फिल्मच्या प्रॉफिटमध्ये 70 टक्के हिस्सा घेतो. त्यामुळेच तर आमिर आज बॉलिवूडमधील सर्वात महागड्या स्टार्सच्या पंक्तित बसला आहे. 'नेटवर्दियर' नुसार, अमिर खानची नेटवर्थ 180 मिलियन डॉलर (1260 कोटी रूपये) एवढी आहे. अमिरचे वार्षिक उत्पन्न (21 मिलियन डॉलर) जवळपास 147 कोटी रुपये आहे.

 

अमेरिकेतील बेवर्ली हिल्समध्ये 75 कोटींचा बंगला...

आमिरचा अमेरिकेतील बेवर्ली हिल्समध्ये आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत 75 कोटी रुपये आहे. याशिवाय मुंबईत फ्रीडा अपार्टमेंटमध्ये 65 कोटींचे घर आहे. यासोबतच आमिरकडे अनेक लक्झरी कार आहेत. ब्रॅड एंडोर्समेंटमध्येही आमिर मोठी कमाई करतो. 2018 मध्ये आमिर खानने मोबाइल कंपनी व्हीव्होशी एक डील केली होती. एक वर्षासाठी आमिरने 15 कोटी रुपये मानधन घेतले होते.

 

पाचगणीत 15 कोटींचा बंगला, वडिलोपार्जित गावात 22 घरे...
आमिर याचा पाचगणी या हील स्टेशनवर जवळपास 15 कोटी रुपयांचा बंगला आहे. 2 एकर जागेत हा बंगला बांधण्यात आला आहे. आमिर खान आपली   फॅमिली आणि मित्रांसोबत कायम पाचगणीत जातात. उत्तर प्रदेशातील हरदोईपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले शाहाबादमध्ये अख्तियारपूर हे आमिरचे वडिलोपार्जित गाव आहे. येथे 125 बिघे जमीन आहे. अख्तियारपूरमध्ये आमिर खानचे एकून 22 घरे आहेत. या घरांची किंमत जवळपास 30 कोटी रुपये आहे.

 

आमिरच्या कार कलेक्शनमध्ये आहे आलिशान कार तिची किंमत 10.5 कोटी रुपये...
आमिरच्या कार कलेक्शनबाबत सांगायचे झाले तर त्याच्याकडे BMW 7 सीरिज (1.2 कोटी), रेंज रोव्हर (1.74 कोटी), बेंटले कांटिनेंटल फ्लाइंग स्पर (3.10 कोटी), रॉल्स रॉयस कूपे (बुलेटप्रूफ) (4.6 कोटी), मर्सिडीज बेंज एस600 Guard (10.50 कोटी) सारख्या लक्झरी कार आहेत. मर्सिडीज बेंज एस600 Guard बुलेटप्रूफ आणि बॉम्बप्रूफ कार आहे.

 

आमिरच्या घरातील फर्नीचरची किंमत 2 कोटी रुपये...
आमिरच्या घरात Furlenco फर्नीचर (premium furniture) बसविण्यात आले आहे. याची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...