Home | News | Bollywood Actor Actress Who Died Penniless

तीन दिवस घरात होता कुणाचा मृतदेह तर कुणी वाईट अवस्थेत रस्त्यावर आढळले, वाईट होता या 13 बॉलिवूड सेलेब्सचा अखेरचा काळ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 11:15 AM IST

यामधील 10 सेलेब्सकडे तर शेवटच्या काळात उपचारांसाठीही पैसे नव्हते

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  मुंबई. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये स्टारडम, दौलत कमावली पण शेवटच्या काळात ते अज्ञातवासात राहिले. यामधील एक नाव म्हणजे सुपरस्टार परवीन बाबी. परवीन बाबी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा काळ एकट्यातच घालवला. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. परवीनसोबतच बॉलिवूडच्या अनेक स्टार्सचा शेवटचा काळ वाईट होता. ते या काळात अज्ञातवासात होते आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. यामधील 10 लोकांची परिस्थिती तर खुप वाईट होती, त्यांच्याजवळ उपचार घेण्यासाठीही पैसे नव्हते.

  परवीन बाबी
  - अखेरच्या काळात बिघडले होते परवीनचे मानसिक संतूलन...
  - परवीन बाबीची गणना बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये होते. पण सुपरस्टार असूनदेखील शेवटच्या काळात ती एकटी होती.
  - महेश भट, कबीर बेदी, डॅनी यांच्यासोबतचे तिचे प्रेमकिस्से बरेच गाजले होते. मात्र प्रेमात नेहमीच तिच्या पदरी अपयश पडले.
  - 'दीवार', 'नमक हलाल', 'अमर अकबर अँथोनी' आणि 'शान'सारख्या सुपरहिट सिनेमांत काम करणा-या परवीन बाबीचा मृत्यू मुंबईमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये झाला होता. 22 जानेवारी 2005ला तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये मिळाला होता. - तिच्या शेजा-यांनी पोलिसांना सूचना दिली, की ती मागील तीन दिवसांपासून वर्तमानपत्र आणि दूध घेत नाहीये. त्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली.
  - परवीन मुंबईमध्ये दिर्घकाळ एकटी राहिली. ती डिप्रेशनची शिकार झाली होती आणि तिने स्वत: जगापासून दूर ठेवले होते. ती कुणालाच भेटत नव्हती, सिनेमांतून अचानक गायब होऊन अज्ञातवासात गेली होती.
  - 2002 मध्ये आईच्या निधनानंतर परवीनचे मानसिक संतूलन बघिडले होते.
  - परवीन ख्रिश्चन धर्माची अनुयायी होती. ती कधीकधी चर्चच्या संपर्कात राहात असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वीपासून तिने ओळखीच्या लोकांशी संपर्क तोडला होता.
  - 20 वर्षांपासून परवीनच्या शेजारी राहणा-या एम.एस. मल्होत्रा यांनी तिला एवढ्या वर्षांत फक्त 15 वेळाच पाहिले होते.
  - तिच्या आयुष्यातील शेवटची छायाचित्रे पाहून तिचा मृत्यू खरंच खूप वेदनादायक होता, हे दिसून येते.
  परवीन प्रमाणेच बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत, जे गतकाळात प्रसिध्द होते. त्यांच्याकडे सर्वकाही होते, मात्र अचानक त्यांचे स्टारडम संपले आणि त्यांना रस्त्यावर यावे लागले. काही स्टार्स इतक्या वाईट अवस्थेत दिसले, की लोक त्यांना ओळखूसुध्दा शकले नाहीत.
  - यामध्ये श्रीवल्लभ व्यास यांच्यापासून ते शोलेचे रहीम चाचा अर्थातच अभिनेते ए.के. हंगल यांच्या नावाचा समावेश आहे.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा बॉलिवूडच्या अशाच काही सेलेब्सविषयी...

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  2. गीता कपूर 


  'पाकीजा'(1972) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री गीता कपूरने 26 मे रोजी सकाळी 9 वाजता मुंबई येथील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. एक वर्षापासून गीता त्यांच्या मुलांची वाट पाहत होत्या पण त्यांच्यासाठी कोणीच आले नाही. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये गीता यांचा कोरिओग्राफ असलेला मुलगा त्यांना हॉस्पीटलमध्ये सोडून निघून गेला होता आणि नंतर परतलाच नाही. मागील वर्षापासून अशोक पंडीत आणि गीता हे सेलेब्स त्यांचा खर्च करत होते. अशोक पंडीत यांनी गीता यांच्या निधनाची बातमी ट्वीटरवर दिली. मुलांची वाट पाहत पाहत त्यांनी जीव सोडला आणि त्याचमुळे त्या जास्त कमजोर झाल्या होत्या असे त्यांनी सांगितले. पण शेवटपर्यंत गीता यांचा मुलगा अथवा मुलगी यांनी कोणीही त्यांची दखल घेतली नाही.

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  गीतांजलि नागपाल


  अनेक डिझायनरसाठी रॅम्प वॉक केलेली अभिनेत्री गीतांजली नागपाल वयाच्या 32व्या वर्षी 2007 साली रस्त्यावर भीक मागताना दिसली होती. गीतांजली ड्रग्जच्या आहारी गेली होती आणि त्यासाठी भिखारीपासून कामवालीही बनली. 2008 साली पैशांच्या तंगीतच तिने जगाला अलविदा केला. 

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  श्रीवल्लभ व्यास


  आमिर खानचा प्रसिद्ध चित्रपट 'लगान' मध्ये ईश्वर काका उर्फ श्रीवल्लभ व्यास(60) यांनी दीर्घ आजाराने 7 जानेवारी 2018 साली जयपूर येथे अखेरचा श्वास घेतला. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना पॅरॅलॅसिसचा अॅटॅक आला होता ज्यानंतर त्यांची तब्येत फार खराब झाली आणि ते केवळ लिक्वीड डाएटवर होते. 2013 साली त्यांची फॅमिली जैसलमेरहून त्यांच्या इलाजासाठी जयपूरला शिफ्ट झाले. त्यांची पत्नी शोभा यांनी सांगितले की, कठिण काळात आमिर खानने त्यांना फार सपोर्ट केला. आमिरसोबत इमरान खान आणि मनोज वाजपेयी यांनीही त्यांना मदत केली. श्रीवल्लभ यांनी  'सरदार','माया मेम साहब', 'वेलकम टु सज्जनपुर', 'सरफरोश', 'लगान', 'बंटी और बबली', 'चांदनी बार' 'विरुद्ध' यांसह 60 चित्रपटात अभिनय केला आहे.

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  निशा नूर


  हे नाव तु्म्हाला ओळखीचे वाटत नसेल पण हे नाव 80 च्या दशकात फारच फेमस होते. निशाने रजनीकांत आणि कमल हासन यांच्याबरोबर काम केले आहे. असे म्हणतात की एका प्रोड्युसरने तिला वेश्याव्यवसात ढकलले होते. सर्वच लोकांनी तिच्यावरुन नाक मुरडले त्यामुळे तिची हालत अजूनच खराब झाली.  हळूहळू काम न मिळाल्याने तिची आर्थिक स्थिती खराब झाली आणि ती अक्षरशः रस्त्यावर आली. रस्त्यावर अतिशय कृश अवस्थेत जेव्हा ती सापडली तेव्हा लोकांनी तिला इस्पितळात दाखल केले तेव्हा कळाले की तिला एड्स झाला आहे. 2007 साली निशाने अखेरचा श्वास घेतला. 

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  ए.के. हंगल


  शोलेचा पॉप्युलर डायलॉग 'इतना सन्नाटा क्यों है भाई' लोकांना आजही लक्षात आहे. पण आता हा डायलॉग बोलण्यासाठी ए.के.हंगल या जगात नाहीत.  'शोले' आणि 'बावर्ची' यासारख्या उत्तम चित्रपटात काम करणाऱ्या हंगल यांनी 26 ऑगस्ट 2012 साली अखएरचा श्वास घेतला. त्यांना अनेक प्रकारचे आजार झाले होते. असे म्हणतात की त्यांच्याकडे इलाजासाठीही पैसे नव्हते. अमिताभ बच्चन यांनी हंगल यांना इलाजासाठी 20 लाख रुपये दिले होते.

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  अचला सचदेव


  'ऐ मेरी जोहरा जबीं तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसीं...जी हां, या 'वक्त' चित्रपटातील गाण्यात असलेल्या अचला सचदेव यांचे 2012 साली निधन झाले. अचला 2002 पतीच्या मृत्यूनंतर पुण्यात राहत होत्या. त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. घरात घसरुन पडल्यामुळे अचला यांच्या जांघेचे हाड तुटले. अचला यांच्या मुला-मुलीनेही त्यांच्या शेवटच्या काळात त्यांचा साथ दिला नाही.

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  भगवान दादा


  भगवान दादा कॉमेडी चित्रपट 'अलबेला' साठी ओळखले जातात. हिंदी चित्रपटात डान्सचा एक वेगळाच फॉर्म तयार करण्याचे श्रेय भगवानदादा यांना जाते. कधीकाळी आलिशान जीवन जगलेले भगवानदादा यांना पैशांची तंगी जाणवु लागली आणि मग त्यांनी लहानमोठे रोल करण्यास सुरुवात केली. शेवटच्या काळात एकटे असलेल्या भगवानदादा यांना भेटण्यासाठी सी. रामचंद्र, ओम प्रकाश, राजिन्दर किशन हे त्यांचे मित्र भेटायला जात असत. 4 फेब्रुवारी 2002 साली 89 व्या वर्षी त्यांनी जगाला अलविदा केले. 

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  जगदीश माळी 


  अंतरा माळीचे वडील आणि फेमस फोटोग्राफर जगदीश माळी यांना रस्त्यावर भीक मागताना पाहण्यात आले होते. जगदीश यांना 
  मिंक बरार नावाच्या मॉडेलने ओळखले आणि त्यांची काळजी घेतली. जगदीश मानसिक दृष्ट्या आजारी होते आणि त्यांच्या फाटक्या कपड्यांवरुन त्यांची आर्थिक स्थिती किती खालावली होती याचा अंदाजा येतो. 13 मे 2013 साली त्यांचा मृत्यू झाला.

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  अभिनेत्री विमी 


  1960-70 दशकातील अभिनेत्री विमी यांनी 'हमराज' (1967) सिनेमातून पदार्पण केले आणि रात्रीतून लोकप्रियता मिळवली. या सुपरहिट सिनेमानंतर त्यांनी 'आबरू' (1968), 'पतंगा' (1971), 'गुड्डी' (1971), 'कहीं आर कहीं पार' (1971), 'वचन' (1974) सह अनेक सिनेमांत काम केले. विमी यांना खूप लवकर स्टारडम मिळाले होते. त्यांनी अनेक मासिकासाठी फोटोशूटसुध्दा केले होते. त्यांच्याकडे सर्वकाही होते, परंतु पतीसोबत घटस्फोट झाल्याच्या त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. नंतर त्यांना सिनेमे मिळणेदेखील बंद झाले होते. आयुष्यातील शेवटचे क्षण त्या एकांतात जगल्या. त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. शेवटच्या काळात त्या स्वत:चा उपचारसुध्दा करू शकल्या नाहीत. नानावटी रुग्णालयातील जनरल वॉर्डमध्ये त्यांनी शेवटचा श्वास (22 ऑगस्ट 1977) घेतला. अंत्य संस्कारासाठी पैसे नसल्याने  एका ठेल्यावरुन स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव नेण्यात आले होते. 

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  अभिनेत्री मीना कुमारी 


  मीना कुमारीने रील लाइफमध्ये खूप काही मिळवले. परंतु रिअल लाइफमध्ये त्या ख-या प्रेमाच्या शोधातच राहिल्या. दु:ख आणि एकांताने त्यांना खचून टाकले होते. त्या दारूच्या आधीन गेल्या होत्या. दारूमुळे त्यांचे लिव्हर खराब झाले आणि अखेर त्यांचा मृत्यू (31 मार्च, 1972) झाला. शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ कुणीच नव्हते, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. रुग्णालयाचे बिल भरण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. मीना कुमारी यांनी 'एक ही भूल' (1940), 'पिया घर आजा' (1947), 'सनम' (1951), 'तमाशा' (1952), 'दिल अपना और प्रीत पराई' (1960), 'मेरे अपने' (1971), 'पाकीजा' (1972) सह अनेक सिनेमांत काम केले. 

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  भारत भूषण
   
  1940चे सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक भारत भूषण यांच्या आयुष्यातील सुध्दा शेवटचे क्षण वाईट होते. त्यांना हिंदी सिनेमांच्या उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये सामील केले जात होते. विशेषत: त्यांचे धार्मिक सिनेमे बॉक्स ऑफिसवर गोल्डन जुबली साजरा करण्यासाठी होते. 'आनंद मठ', 'मिर्जा गालिब', 'बरसात की रात' आणि 'जहा आरा'सारखे हिट सिनेमे देणारे भारत भूषण यांच्या आयुष्यात एक काळ असाही आला, की त्यांना कुणीच विचार नव्हते. मीना कुमारीसोबतच्या अफेअरला त्यांच्या करिअरचा डाउन फॉल मानले जाते. त्यानंतर त्यांना आणखी धक्का लागला जेव्हा त्यांना सिनेमांचे ऑफर्स येणे बंद झाल्या. भारत भूषण यांच्याकडे आयुष्य घालवण्यासाठीसुध्दा पैसे नव्हते. त्यांनी एक फिल्म स्टूडिओमध्ये वॉचमनची नोकरी केली. त्यांचे 1992मध्ये एका भाड्याच्या घरात निधन झाले.

 • Bollywood Actor Actress Who Died Penniless

  नलिनी जयवंत 


  गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री नलिनी जयवंत यांनी अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. 1941 साली आलेल्या 'बहन' या सिनेमाद्वारे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. मात्र आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांच्याकडे जवळचे कुणीही नव्हते. त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठीही पैसे नव्हते. 20 डिसेंबर, 2010 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी मृत्यूच्या तीन दिवसांनी समोर आली होती. त्यांनी 'मिलन' (1958), 'हम सब चोर हैं' (1956), 'सेनापति' (1961), 'नीलमणि' (1957), 'गर्ल्स होस्टल' (1963) सह अनेक सिनेमे केले. 

Trending