आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील अजय देवगणसोबत स्विमिंग कॉश्च्युमध्ये दिसली मुलगी न्यासा, फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत व्हेकेशन एन्जॉय करतोय अजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेता अजय देवगणने अलीकडेच सोशल मीडियावर एक फोटो  (व्हिडिओ फॉर्मेटमध्ये) शेअर केला आहे. या फोटोत अजयसोबत त्याची पत्नी काजोल, मुलगा युग आणि मुलगी न्यासा दिसत आहे. अजयच्या कुटुंबासोबत त्याच्या मित्राचेही पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. अजयने फोटोला कॅप्शन दिले, "ख्रिसमस आणि न्यू ईअरच्या मध्ये.." फोटोत काजोल आणि न्यासा स्विमिंग कॉश्च्युममध्ये दिसत आहेत. न्यासा अजय देवगणसोबत तर काजोल मुलगा यूगसोबत दिसतेय. हा फोटो आतापर्यंत 4.25 लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Somewhere in between Christmas & New Year 🔛

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on Dec 26, 2018 at 1:21am PST

 


व्हिडिओचे बॅकग्राऊंड बघून फॅन्स विचारत आहेत प्रश्न...

- व्हिडिओत अजय आणि त्याच्या फ्रेंड्सच्या फॅमिलीची स्टील इमेज दिसतेय, तर बॅकग्राऊंडमध्ये ढग हलताना दिसत आहे. यावरुन अजय देवगणने चाहते त्याला हा व्हिडिओ नेमका कसा बनवला असा प्रश्न विचारत आहेत. एका चाहत्याने लिहिले, "ढग पुढे कसे जात आहेत?  अतिशय सुरेख फोटो सिंघम सर.." आणखी एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, "अतिशय सुंदर कॅप्चर. हा फोटो कसा घेतला? कोणते App वापरले." एका यूजरने कमेंट केले, "उत्कृष्ट एडिटिंग कुणी केले... हे सगळे लोक एकाच जागी उभे आहेत आणि मागे ढग हलताना दिसत आहे." अजय देवगण येत्या 28 डिसेंबर रोजी रिलीज होत असलेल्या 'सिम्बा' या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...