आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. अभिनेता अजय देवगण ही कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी नुकताच चित्रपटातील अजय देवगणचा तानाजी मालसुरेंच्या भूमिकेतील पहिला लूक शेअर केला आहे. हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Happy New Year!!! Har Har Mahadev!!! @ajaydevgn @TanhajiFilm pic.twitter.com/pcO579Ipro
— Om Raut (@omraut) January 1, 2019
150 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. अद्यापही चित्रपटातील इतर व्यक्तीरेखांवरून पडदा उठणे बाकी आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे. मराठी अभिनेता अजिंक्य देव या चित्रपटातील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटात सलमान खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.