आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारने ट्वीट करून त्याची बाजु मांडत लिहले, 'मी गुरमीत राम रहीमला कधीच नाही भेटलो'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड- बरगाडीमध्ये अपमानजनक घटना आणि त्यानंतर झालेल्या गोळीबार प्रकरणात अक्षय कुमारने आपली बाजु मांडली. त्याने म्हटले आहे की, 'गुरमीत राम रहीमशी मी कधीच भेटलो नाही.' या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआइटी) अक्षयला नोटीस पाठवली आहे. अक्षयने डेरा सच्‍चा सौदा आश्रमाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची सुखबीर बादलसोबत बैठक करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अक्षयने ट्वीट करत हे आरोप खोटे असल्याचे सांगितले.

 

> अक्षय कुमारवर आरोप आहे की, त्याने डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला माफी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या मुंबईस्थित घरी सुखबीर बादलची काही लोकांसोबत बैठक घडवून आणल्याचा आरोप आहे. रविवारी या प्रकरणात एसआयटीने माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल आणि अक्षय कुमार या तिघांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस एसआयटीचे सदस्य आयजी कुंवर विजय प्रताप सिंग यांच्याकडून सादर करण्यात आली आहे.

 

> एसआयटीने अमृतसरमधील सर्किट हाउसमध्ये 16 नोव्हेंबरला माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, 19 नोव्हेंबरला सुखबीर बादल आणि 21 नोव्हेंबरला अक्षय कुमारला हजर राहण्यास सांगितले आहे.

 

> या प्रकरणात यासंबंधीं फरीदकोटमधील कोटकपूरा शहरातील स्टेशनमध्ये 7 ऑगस्ट 2018ला भादंसचे कलम 307, 323, 341, 148, 149 आणि आर्म्स अॅक्टचे कलम 27 अंतर्गत एफआयआर दाखल झाला आहे. या प्रकरणी सोमवारी शिअदची बैठक झाली. या बैठकीत एसआयटीमार्फत ठरवून दिलेल्या तारखांवर प्रकाश सिंग बादल आणि सुखबीर सिंग बादलला हजर राहण्याचा निर्णय झाला आहे. तिकडे बॉलीवुड स्‍टार अक्षय कुमारने ट्वीट करत या संपूर्ण प्रकरणाविषयी आपली भुमिका मांडली आहे.

 

> ट्विटमध्ये अक्षय कुमारने लिहले की, मला मिळालेल्या माहीतीनुसार सोशल मीडियावर माझ्याबद्दल अनेक अफवा आणि चुकिचे समज वाढत आहे. यात गुरमीत राम रहीम व्यक्तीसोबत माझा संबंध असल्याचे सांगून सुखबीर बादलसोबत एक काल्पनिक बैठकबद्दल सांगितले जात आहे. पुढे त्याने म्हटले आहे की, मी माझ्या पुर्ण आयुष्यात एकदाही गुरमीत राम रहीमला भेटलो नाही. मला समजले की, मुंबईमध्ये तो माझ्या घराजवळ राहत होता परंतू मी सांगू इच्छितो की रस्त्याने जातानादेखिल आम्ही एकमेकांना पाहीले नाही.

 

> अॅक्‍की ने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी अनेक वर्षांपासून पंजाबी संस्‍कृतीला प्रोत्साहन देणारे चित्रपट करत आहे. मी सिख धर्माचा गौरवशाली इतिहास आणि परंपरांचा मान वाढवणारे सिंग इज किंग, केसरी यासारखे चित्रपट तयार केले. मला पंजाबी असल्याचा गर्व आहे. सिख पंथ आणि त्याच्या मान्यतांवर माझी खुप श्रद्धा आहे.

 

> पुढे त्याने लिहले आहे की, मी असे कधीच काही करणार नाही ज्यापासून माझ्यावर प्रेम करणारे माझा सम्‍मान करणारे माझ्या पंजाबी भाऊ- बहिणींना वाईट वाटेल. मी जे काही लिहले आहे ते सर्व खरे आहे. मी आव्हान करतो की कोणी मला खोटे ठरवून दाखवावे.' अशा पद्धतीने अक्षय कुमारने त्याची बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...