Home | Gossip | bollywood actor akshay kumar in udaypur for isha ambani's pre wedding ceremony

ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग सेरेमनीसाठी बॉलिवूडच्या दोन डिझायनरने तयार केले आऊटफिट, जोरात सुरु आहे तयारी, लग्नासाठी अक्षय कुमारसुद्धा पोहोचले उदयपूरला, महाआरतीनंतर होईल ग्रँड संगीत सेरेमनीला सुरुवात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 01:13 PM IST

शाहरुख खान करणार डान्स तर नागालँडचा म्युझिक बँड करणार परफॉर्म..

 • bollywood actor akshay kumar in udaypur for isha ambani's pre wedding ceremony

  मुंबई : मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग सेरेमनीसाठी कलाकार उदयपूरला पोहोचत आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अक्षय कुमार उदयपूरला पोहोचले आहेत. मनीष 8 आणि 9 डिसेंबरला होणाऱ्या प्री वेडिंग सेरेमनीसाठी ड्रेसेस डिझाईन करणार आहेत. ते ओबेरॉय उदयविलास आणि सिटी पॅलेसच्या स्टाफसाठीही ड्रेसेस बनवणार आहेत. मनीषने काही दिवसांपूर्वीच अनिल अंबानी, नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या सोबतचे फोटोज शेअर केले आहेत. मनीषबरोबरच बॉलिवूडचे अजून एक डिझायनर सब्यसाची यानेसुद्धा अंबानी फॅमिलीसाठी ड्रेसेस डिझाईन केले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 किंवा 9 डिसेंबरला प्रधानमंत्री मोदीसुद्धा या प्री वेडिंग सेरेमनीमध्ये सामील होऊ शकतात. अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींसोबत त्यांची पत्नी हिलरी क्लिंटनसुद्धा शनिवारी उदयपुरात येणार आहेत. क्लिंटन दाम्पत्य चार दिवस मेवाडमध्येच राहील. ते 11 डिसेंबरला मुंबईसाठी रवाना होतील.

  नागालँडच्या सिंगर्सचा एक ग्रुप करेल परफॉर्म..
  - नागालँडचे संगीतकार निसे मेरुनो ईशा अंबानीच्या लग्नात परफॉर्म करणार आहे. निसे मेरुनो पूर्वेकडील प्रसिद्ध गायक आहे आणि त्यांना बरेच पुरस्कारही मिळालेले आहेत.
  - निसे मेरुने त्यांच्या ग्रुपसोबत नागालँडमध्ये परफॉर्म करतात. मिळालेल्या माहिती नुसार निसे रिसेप्शनच्यावेळी त्यांच्या गाण्यांनी सर्वांचे मनोरंजन करणार आहेत.
  -लग्नानंतर 13 डिसेंबरला ईशा आणि आनंद पिरमलचे रिसेप्शन आयोजित करण्यात आलेले आहे. अंबानी फॅमिलीसाठी निसे पहिल्यांदा परफॉर्म करणार आहे पण पिरामल फॅमिलीसाठी त्यांनी 2009 मध्येही परफॉर्म केले होते. स्वाती पिरमलची मुलगी नंदिनी पिरामल हिच्या लग्नात जयपूरमध्ये निसे ग्रुपने परफॉर्म केले होते.

  महाआरतीने होईल सुरुवात ग्रँड सेरेमनीची..
  - ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नाच्या आधी लेक सिटी उदयपूर येथे 8 आणि 9 डिसेंबरला प्री वेडिंग सेरेमनी होणार आहे. हॉटेल उदय विलासमध्ये ग्रँड सेलिब्रेशनची तयारी जोरात सुरु आहे.
  - बुधवारपासूनच व्हीव्हीआयपी पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. 8 डिसेंबरला अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन येणार आहेत. त्यांचे पती आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटनच्याही येण्याची शक्यता आहे. यापूर्वीच अमेरिका सुरक्षा एजन्सीच्या गार्ड्सने उदयपूर पोलिसांसोबत कार्यक्रमाच्या सगळ्या स्थळांची पाहणी केली आहे. अनिल अंबानीसुद्धा आपल्या परिवारासोबत उदयपूरमध्ये आहेत. 8 डिसेंबरला महाआरतीने ग्रँड सेरेमनीची
  सुरुवात होईल.

  - या सेरेमनीमध्ये बॉलिवूड अॅक्टर शाहरुख खान, डिरेक्टर करण जोहर त्याचबरोबर अमेरिकन सिंगर अँड रायटर टेलर स्विफ्ट यांचे परफॉर्मन्स होणार आहेत.

 • bollywood actor akshay kumar in udaypur for isha ambani's pre wedding ceremony
 • bollywood actor akshay kumar in udaypur for isha ambani's pre wedding ceremony
 • bollywood actor akshay kumar in udaypur for isha ambani's pre wedding ceremony

Trending