आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकी यांनी सांगितली मुलाच्या नावामागची कहाणी, म्हणाले - 'मला लहानपणी नखांनी बोचकारायचा म्हणून टायगर नाव ठेवले'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मुलगा टायगर श्रॉफचा आताच प्रदर्शित झालेल्या ‘बागी 3’ या चित्रपटात जॅकी श्रॉफने प्रथमच त्याच्यासोबत काम केले त्याबाबत दैनिक भास्करकडे व्यक्त केल्या भावना....

  • मुलासोबत काम करण्याचा आनंद

"प्रथमच मुलगा टायगरसोबत पडद्यावर दिसलो. खरंच खूप आनंद झाला. आयुष्यात काही चांगल्या गोष्टीही घडतात. देवाने चांगलेच केले आहे. मुलासोबत पडद्यावर दिसलो. मी गेल्यानंतर हे सर्वांच्याच लक्षात राहील. गेल्यानंतर पडद्यावर आठवणी असतील. सोबत काम करण्याची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. टायगर सहा-सात वर्षांपासून काम करत आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी बऱ्याच स्क्रिप्ट आल्या होत्या, पण उशिरा का होईना ज्यांनी माझ्या मुलाला लाँच केले होते त्यांची स्क्रिप्ट आली. माझ्या मुलाला साजिद भाईने या क्षेत्रात आणले. त्यांच्या प्रॉडक्शनमध्ये संधी मिळणे हा आशीर्वाद आहे. यात वडिलांची भूमिका करायला मिळाली. ही पाहुण्या कलाकाराची भूमिका होती, परंतु हेच खूप आहे."

  • टायगर नावामागची कहाणी...

"टायगर श्राॅफचे नाव टायगर ठेवण्यामागे एक रंजक गोष्ट आहे. तो छोटा होता त्यावेळी तो मला नखांनी बोचकारायचा. माझ्या डोळ्यांना खाण्याचा प्रयत्न करायचा. डोळे पाहिल्यावर त्याला असे वाटायचे की, ही खायची वस्तू आहे. त्यामुळे खाण्यासाठी झेपावायचा. तो त्यावेळी एक-दोन वर्षांचा असेल. त्याच्या याच गोष्टींमुळे मला असे वाटले की, त्याचे नाव टायगर असावे, कारण तो तर चावायचाही."

  • आठवणीतील फोटो

"पहिल्यांदा त्याला कडेवर घेतले तो आनंद व्यक्तच करू शकत नाही. तो एक बापच सांगू शकतो. त्याच्यासोबतचा माझ्याकडे एक फोटो आहे, ज्यात तो माझ्या छातीवर झाेपला आहे. त्या फोटोत आम्ही दोघे आहोत, परंतु आमचा श्वास मात्र एक आहे. टायगर लहानपणापासून खूप शांत स्वभावाचा आहे. एकटाच खेळायचा. पडायचा, उठायचा. आपल्याच विचारात राहायचा. काय विचार करायचा माहीत नाही? परंतु तो नेहमी स्वत:मध्येच गुंग असायचा. आताही विचार करतो. जास्त बोलत नाही. बस, स्वत:चे काम करत राहतो. बोलतो, पापा बोलून काय करणार? काम करून दाखवेल तेच चांगले होईल."

  • टायगरमुळे नवी ओळख मिळाली

"आताच टायगरचा वाढदिवस झाला, तर मी सोशल मीडियावर लिहिले की, इतक्या छोटया वयात त्याने मला नवी ओळख दिली, यामुळे खूप आभारी आहे. मी टायगरच्या वडिलांच्या नावाने ओळखला जातो, हे खूप छान वाटते. माझे जेवढे नाव झाले ते ठीक आहे, परंतु त्याच्याही पुढे माझ्या मुलाने माझी ओळख निर्माण केली आहे. तो माझा मुलगा आहे म्हणून मला त्याचे सारे चित्रपट आवडतात. त्याला बॉलिवूडमध्ये येऊन फक्त 6 वर्षे झाली आहेत. खूप मेहनतीने काम करतोय. त्याच्याकडे मायनस 7 डिग्रीमध्ये काम करणारा मुलगा म्हणून पाहतो. त्याचे सकाळी सहा-साडे सहा वाजता उठून तयार होणे आणि रात्री 10 वाजता झोपणे. त्याच्यात एक शिस्त पाहतोय. जस जशा त्याच्या जबाबदाऱ्या वाढत आहेत, तशी त्याची शिस्तही वाढत चालली आहे. हे सर्व मुले समजून घेतात आणि समजून घ्यायलाही पाहिजे."