आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा22 वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या जिमी शेरगिलने 1996 मध्ये 'माचिस' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यावर्षी जिमी 'मुक्काबाज', 'वीरे की वेडिंग' 'फेमॉस', 'साहेब बीवी और गँगस्टर 3' आणि 'हैप्पी फिर भाग जाएगी' या पाच चित्रपटात दिसला आहे. सध्या तो लव्ह रंजनच्या आगामी 'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. जिमीसोबत झालेला संवाद -
चित्रपटात तू बॅड बॉयची भूमिका का निवडतोस ?
- खरंतर, भूमिका मी ठरवून निवडत नाही. मी वेगळ्या भूमिका निवडण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. मी सर्वात आधी सामान्य माणसाची भूमिका स्वीकारत असतो. जो मी आहे. त्यानंतर मला ते पात्र वाईट की चांगले ते कळते.'मुक्काबाज' मधील भूमिका खरंच चांगली नव्हती. ते पात्र फारच वाईट होते. मात्र लोकांना ते आवडले. त्यांनी मला शिव्या दिल्या त्याच माझ्यासाठी शुभेच्छा ठरल्या, असे मी म्हणेन.
तुझा चित्रपट हिट ठरो की फ्लॉप. टीकाकाराच्या नजरेतून तू नेहमी वाचतोस ?
- 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'बँग-बँग' मध्ये मी फक्त ओपनिंग सिक्वेंसमध्ये होतो. माझा दिग्दर्शक मित्र सिद्धार्थ आनंदसाठी मी हा चित्रपट केला होता. मात्र मला या चित्रपटासाठीदेखील प्रतिक्रिया आल्या होत्या, तेव्हा मला फार नवल वाटले होते. तेव्हा मी फक्त एकाच दृश्यात होतो. खरं तर, मला नापसंत करणारे टीकाकार फारचं कमी आहेत. याचा मला आनंद आहे, असेही कमीच राहायला हवेत.
तू फार चांगले काम केले आहे. मात्र जितका हक्क होता तितके मिळाले नाही, असे लोकांना वाटते ?
- खरं तर, लोकांचे हेच म्हणणे माझ्यासाठी खूप मोठे आहे. यावरून त्यांना माझ्यात अभिनय क्षमता दिसते. ते मला झिडकारत नाहीत किंवा चित्रपटात उगीच हा काय करतो, असेही म्हणत नाहीत.
पुढे वाचा, जिमीने मुलाखतीत शेअर केलेल्या खास गोष्टी..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.