आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actor Paresh Rawal Says To Pakistani PM, 'a Sad Soul', Tweet Goes Viral

पाकिस्तानच्या पंतप्रधानाला बॉलिवूड अभिनेते परेश रावल म्हणाले, 'दुखी आत्मा', ट्विट होत आहे व्हायरल 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेते परेश रावल चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. अनेक मुद्द्यांवर सोशल मीडियाद्वारे आपले मत मांडणारे परेश रावल यांनी अशातच पाकिस्तानचे प्रधानमंत्री इमरान खान यांच्याबद्दल एक ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. या ट्वीटमध्ये परेश रावल यांनी इमरान खानवर निशाना साधत त्याला 'शाळेतील दुखी मुलगा' संबोधले आहे. पाकिस्तान सरकारबद्दल परेश रावल यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. परेश रावल यांनी इमरान खानबद्दल आपले मत व्यक्त करत ट्विटरवर लिहिले, "मी स्वतःला हे शेअर करण्यापासून रोखू शकलो नाही. इमरान खान शाळेतील तो दुखी मुलगा आहे, ज्याने वर्षभर केवळ 'मोदी मोदी' वाचले आणि परीक्षेत अमित शाह आले." 

बातम्या आणखी आहेत...