आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actor Ranveer Singh And Deepika Padukone At Kapil Sharma Wedding Reception

कपिल शर्माच्या रिसेप्शनमध्ये रणवीरला बघून फोटोग्राफर्स ओरडले-'बाबा-बाबा', दीपिकाने विचारले- 'दररोज हे बघून तू बोअर होत नाहीस का' : VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई- अभिनेता रणवीर सिंह पत्नी दीपिकासोबत सोमवारी रात्री विनोदवीर कपिल शर्माच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सहभागी झाला होता. मुंबईतील हॉटेल जे. डब्ल्यू मॅरिएट येथे झालेल्या या ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीत जेव्हा रणवीर आणि दीपिका फोटोग्राफर्सना पोज देण्यासाठी आले, तेव्हा सगळे त्याला बाबा-बाबा अशी हाक मारु लागले. हे ऐकून दीपिकाने रणवीरला प्रश्न विचारला की,  "हे दररोज बघून तू बोअर होत नाहीस का?" हे ऐकून रणवीरने 'ओह प्लीज' असे म्हणते तिला इशा-याने थांबवले. हा संपूर्ण प्रसंग अतिशय मजेशीर होता. रणवीर आणी दीपिकाची ही फनी केमिस्ट्री उपस्थितांना भावली. 


रणवीरने केली 'खली-बली' स्टेप्स...
- पोज देण्यापूर्वी दीपिकाने तिची साडी सावरली आणि त्यानंतर दोघांनी फोटोग्राफर्सना पोज दिली. रणवीर यावेळी मस्तीच्या मूडमध्ये होता. त्याने जाता-जाता 'पद्मावत' चित्रपटातील 'खली-बली'ची डान्स स्टेप्स केली, त्यावर फोटोग्राफर्सनी रणवीरला 'बाबा वन्स मोअर' असे म्हटले. पण नंतर रणवीर न थांबता हॉटेलच्या दिशेने निघून गेला. रणवीर आणि दीपिकाचे याचवर्षी 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीत लग्न झाले.  

बातम्या आणखी आहेत...