आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेतून लवकर उठत नसल्याने अनेकदा दुपारपर्यंत कुणी बर्थडे विश करत नाही, आज साजरा होणार दुहेरी आनंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • 54 व्या वाढदिवसानिमित्त सलमान खानने दिव्य मराठीसोबत विशेष चर्चा केली.
  • उमेश कुमार उपाध्याय आणि अमित कर्ण यांच्याशी मुंबईत झालेली चर्चा

मुंबईः बर्थडेचे नाव ऐकून सर्वात आधी विचार येतो की, जीवनातील आणखी एक वर्षे निघून गेले. मी पहिल्यापासून माझा वाढदिवस कुटुंबासेाबतच साजरा करत आलो आहे. कुटुंबासोबत चांगले वाटते. कुटुंबाचे वातावरण चांगले आहे. आमचे कुटुंब चांगले राहो आणि मी त्यांच्यासोबत आनंदाने वाढदिवस साजरा करत राहो, अशी देवाचरणी प्रार्थना करतो. वाढदिवशी सर्वात आधी विश करण्यासाठी आमच्या येथे काही स्पर्धा नसते. कोणीही कधी विश करतात. कधी-कधी दुपारपर्यंत कुणीच शुभेच्छा देत नाही, कारण दुपारपर्यंत मी झोपलेलो असतो.


व्हॉट्सअॅप वर मुलांचे मॅसेज 'हाय मामू, हाय चाचू' टाकलेले असतात. देवाने माझ्या सर्व कुटुंबाला चांगले आरोग्य दिले. सर्वच आज माझ्यासोबत आहेत. वालिदसाहब, अम्मी, हेलन आंटीपासून सर्व माझ्यासेाबत आहेत. आता तर आणखी सदस्य वाढले आहेत. आधी आम्ही सहा लोक होतो, आई-वडील अरबाज, सोहेल, अलवीरा नंतर आठ झाले. हेलेन आंटी आणि अर्पिता, आता तर खूप झाले आहेत. 

आता कुटुंब मोठे झाले आहे. आमच्या घरात सर्वच व्यग्र असतात. मात्र, सर्वजण एकमेकांसाठी वेळ काढतात. आम्ही सर्व एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. मी तर खालीच राहतो., अरबाज, सोहेल, अर्पिता आणि अलवीरा रोज घरच्या वरच्या मजल्यावर येतात. मी देखील वर जात असतो. सर्वांशी रोज भेट होत असते. जेव्हा बाहेर जातो तेव्हा भेट होत नाही. मात्र, तेव्हा आई-वडिलांसोबत रोज फोनवर बोलत असतो. आता आईचा 8 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. तेव्हा मी घरी नव्हतो. बांगलादेशमध्ये होतो मात्र, सात तारखेलाच रात्री  12 वाजता त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. एकाच बिल्डिंगमध्ये खाली राहतो जिमला जाण्यापूर्वी लंचब्रेकमध्ये भेटतो.

  • बर्थडे पार्टी विषयी सरप्राइज...

बर्थडेवर सरप्राइज पार्टी देण्याचा प्रयत्न कधी-कधी केला जातो, मात्र ते सरप्राइज राहत नाही. खरं तर, आपला वाढदिवस असतो, आपल्याला माहीत असते की, कुणीतरी सरप्राइज पार्टी ठेवली असेलच. आता या वयात कसले सरप्राइज ? तरीदेखील बरेच लोक सरप्राइज देण्याचा प्रयत्न करतात, चला बाहेर जाऊ, फिरून येऊ, असे म्हणतात, मात्र मला कळते. कुणालाही असे म्हटल्यावर कळेलच आणि आपणही विचार करू लागतो की, पार्टी, डिनर किंवा डान्स पार्टी असेल. मात्र, लोकांच्या भावना समजून त्यांच्यासोबत खरंच सरप्राइज वाटलं, खूपच आनंद झाला, असे म्हणावे लागतं. छोट्या-छोट्या मुलांसमोर ती तर माहीत नसल्याचे नाटक करावे लागते.  एकदा सरप्राइज पार्टीचा एक मजेदार किस्सा सांगतो, मला वाढदिवसाची सरप्राइज पार्टी देण्याचा विचार सुरू होता. मला ते कळाले, तेव्हा मी ठरवले की, आज कुठे बाहेर जायचे नाही. तेव्हा मी घरातून निघालो नाही. सर्व बाहेर जायचे, म्हणू लागले. मी म्हणालो, नाही मला जायचे नाही. मला घरीच राहायचे आहे. सर्वांनी प्लॅन करून ठेवला हाेता, तो फेल झाला असता. त्यामुळे सर्वच विनंती करू लागले. मी अडून बसलो, मी म्हणालो, कुठेच जायचे नाही. थकून ते निघून गेले. नंतर मी त्यांना बरीच वाट पाहायला लावली आणि दोन अडीच पर्यंत तेथे पोहोचलो. मीच त्यांना सरप्राइज दिले. 

  • कामाला प्राधान्य देतो...

हा माझा 54 वा वाढदिवस आहे. तोही कामातच जाणार आहे. या दिवशी देखील मी कामात व्यग्र राहणार आहे. मला काम करत राहणे चांगले वाटते. आज काम मिळाले आहे, मी जर सुटी घेतली तर शंभर लोकांच्या कामावर परिणाम होतो. मी राहिल्याने लोकांचा फायदा होतो. यात गैर काहीच नाही. माझे ब्रेसलेट लोकांना अवाडते, त्यामुळे दागिन्यांचे काम करणाऱ्यांना एक्टस्ट्रा काम मिळते. सोनालीची हेअरस्टाइल चांगली वाटली तर ब्युटीपार्लरवाल्यांना चांगले काम मिळते. आम्ही मक्याची कणसं खाल्ली तर लोकदेखील फाॅलो करतात, त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. 'तेरे नाम'च्या वेळेस लोकांना ती हेअरस्टाइल आवडली होती. त्यामुळे एकाच्या कामावर इतराच्या कमाईची चैन चालत असते. त्यामुळे मी काम सोडत नाही. इंडस्ट्रीत तीस वर्षे झाली आहेत. मात्र, नुकतेच इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्याचे जाणवते.

  • आपल्या चित्रपटाला मिळालेल्या प्रेमावर

सध्या माझा चित्रपट 'दबंग ३' थिएटरमध्ये लागला आहे. देशातील बऱ्याच भागात कलम 144  सुरू असूनही चांगली कमाई झाली. अशा काळातही या फ्रँचायझीबद्दल चाहत्यांच्या प्रामाणिकपणेचा मी आभारी आहे. उत्तर भारतातील बऱ्याच भागात परिस्थिती वाईट होती, लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता, असे असूनही, लोक चित्रपट पाहण्यासाठी गेले. या तिसऱ्या पार्टमध्ये खूप काही आहे. खलनायक म्हणून सुदीपचे खूपच कौतुक झाले. चुलबुल आणि रज्जो यांची कहानी चांगली आहे. आम्ही िवनोद खन्ना साहेबांची खूप आठवण काढली. मात्र, प्रमोद खन्ना साहेबांनी ती भूमिका चांगल्या प्रकारे साकारली. त्यांची उणीव भरून काढली. ते पडद्यावरच चांगले दिसले. आम्ही त्यांना पहिल्यांदाच एका अभियानात पाहिले होते. तेव्हा विनोद खन्ना समोर असल्या सारखे वाटत होते. तेव्हा आम्ही त्यांना यात काम करण्याची विनंती केली. या भूमिकेसाठी ते एकदम फिट आहेत. हा चित्रपट यशस्वी ठरला.  

  • दुहेरी आनंद - बहीण अर्पिताच्या घरी येणार चिमुकला पाहुणा

यावर्षी सलमानच्या वाढदिवशी गोड बातमी येणार आहे. याच तारखेवर त्याची बहीण अर्पिताच्या घरी छोटा पाहुणा येणार आहे. अर्पिता याच दिवशी सी-सेक्शन डिलिव्हरीतून दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. त्याच्या जवळच्या लोकांसेाबतच सलमानची मॅनेजर जॉर्डी पटेलनेदेखील भास्करला ही माहिती दिली. सलमान नेहमी आपल्या वाढदिवसाची पार्टी पनवेल फार्म हाऊसमध्ये देतो. मात्र यावेेळेस तो पहिल्यांदाच पालीहिलमधील सोहेल खानच्या घरी वाढदिवस साजरा करणार आहे. 10 वर्षात पहिल्यांदाच तो येथे पार्टी साजरी करेल. जॉर्डी पटेलने सांगितले..., 26 च्या रात्री 12 वाजेपासूनच पाली हिलवर इंडस्ट्रीतील लोकांना निमंत्रण दिले आहे. इंडस्ट्रीतील सर्व लोकांना बोलावण्यात आले आहे. 27 डिसेंबरला सलमान वाढदिवस आणि अर्पिताच्या बाळाची पार्टी दोन्ही साजरी करणार आहे.