Home | News | Bollywood actor shahid kapoor son name zain kapoor

...आणि शाहिदने ठेवले आपल्या मुलाचे नाव, नाव ऐकण्यासाठी चाहते होते उत्सुक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 07, 2018, 03:58 PM IST

बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आता पुन्हा बाबा झाला. पत्नी मीरा राजपुतने गोंडस मुलाला जन्म दिला.

 • Bollywood actor shahid kapoor son name zain kapoor

  एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर आता पुन्हा बाबा झाला. पत्नी मीरा राजपुतने गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर शाहिद त्याचे नाव काय ठेवणार अशा चर्चा सोशल मीडियावर होत्या. त्याचे चाहते त्याला नावा बद्दल सजेशन्स देत होते. कारण शाहिद आणि मीराला 2 वर्षांची एक मुलगी आहे. तिचे नाव मीशा असे आहे. मीरा राजपूतमधला ‘मी’ आणि शाहीद मधला ‘शा’ अशी पहिली अक्षरं जुळवत त्यांनी मुलीचे नाव ठेवले होते. आता मुलाचे नाव काय ठेवले जाणार याची उत्सुकता चाहत्यांना होती.

  ट्वीट करुन सांगितले मुलाचे नाव
  शाहिदने आपल्या मुलाचे नावं सांगत एक ट्वीट केले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव झेन कपूर असे ठेवलेय. त्यांनी ट्वीट करुन सर्व चाहत्यांचे शुभेच्छांसाठी आभार मानले आहे.

  मुलाच्या नावासाठी मिळत होते असे सजेशन्स
  - शाहिद-मीराच्या मुलाच्या नावासाठी सोशल मीडियावर फॅन्स या कपलला मजेदार सजेशन देत होते. यामध्ये राहिद कपूर आणि शमी कपूर हे दोन महत्त्वाचे ऑप्शन्स समोर येत होते.
  - केआरकेने ट्वीट करुन म्हटले होते की, "सर प्लीज बेबी बॉयचे नाव शमी कपूर असावे, जसे मीशा कपूर आहे. शमी हे तुमच्यासाठी खुप चांगले नाव आहे."
  - तर एका यूजरने लिहिले होते की, "पहिले बेबी गर्लचे नाव Mi+Sha=Misha होते तर बेबी बॉयचे नाव Ra+Hid=Rahid असे असेल."

  2016 मध्ये मीराने दिला होता पहिल्या बाळाला जन्म
  - बेबी कपूरच्या जन्मानंतर चाहते सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देत आहेत. आलिया भट, प्रिती झिंटा, करणवीर बोहरासोबतच अनेक स्टार्सने शाहिद-मीराला शुभेच्छा दिल्या आहेत.
  - शाहिद-मीराच्या लग्नाच्या एक वर्षानंतरच मुलगी मीशा (26 ऑगस्ट 2016)चा जन्म झाला. ती या 26 ऑगस्टला 2 वर्षांची झाली.

Trending