आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW: अपयशाने खचायचो, विचारही करायचो, पण नंतर तेच माझी ताकद बनले..!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी रिलीज झालेला टायगर श्रॉफचा 'बागी 2' सुपरहिट ठरला. बॉक्स ऑफिसवर 161 कोटी रुपयांची कमाई केली. नुकतीच 'बागी 3'ची घोषणा करण्यात आली. याव्यतिरिक्त टायगरकडे मोठ्या बॅनरचे काही चित्रपट आहेत. त्याच्याशी झालेली बातचीत.... 

 

* 2018 हे वर्ष तुझ्यासाठी कसे राहिले? 

- हे वर्ष सर्वात चांगले गेले. मी खूप आनंदी आहे. मला सर्व काही मिळाले. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातही मला खूप काही मिळाले. या यशाने मी भारावून गेलो आहे. 

 

* 'बागी 3' हिट होण्यासाठी दबाव आहे का? 
- हिट फ्रँचायझीमध्ये चांगले काम करण्याचे प्रेशर नेहमीच राहते. 'बागी 3' च्या स्क्रिप्टवर अहमद खान आणि साजिद नाडियादवाला यांनी सहा महिने काम केले. 

 

*  'फ्लाइंग जट' आणि 'मुन्ना मायकल'ने बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन केले नाही. यामुळे 'बागी 2'चा आनंद दुप्पट झाला का? 
- हो, बरोबर आहे. दोन चित्रपटांनंतर मिळालेले हे यश आहे. त्यामुळे याचा आनंद दुप्पट झाला आहे. हा चित्रपट माझ्यासाठीच नव्हे, तर कुटुंबासाठी खास आहे. शिवाय ज्यांनी यावर मेहनत घेतली त्या सर्वांसाठी खास आहे. 

 

* यापूर्वीची प्रतिक्रिया कशी होती? 
- त्या वेळी मी खूपच नाराज होतो. मी या दोन्ही (फ्लाइंग जट आणि मुन्ना मायकल) मध्ये ते सर्व केले, जे मी करू शकत होतो. मात्र, ते फ्लॉप ठरले. त्यामुळे मी आत्मविश्वास गमावला होता. मात्र, नंतर मी सावरलो. नंतर या सर्व गोष्टीला मी माझी ताकद बनवले. आता एखाद्या वेळेस चांगला शॉट जमला नाही तरी यावर विचार करतो आणि पुन्हा काम करतो. मला सुरुवातीलाच अपयश मिळाले, या अनुभवातून मी शिकलो. अपयशातूनच यश मिळते या म्हणीवर माझाा विश्वास बसला. या दोन चित्रपटाने मला खूप सशक्त केले. 

 

एमएमए सेंटरमध्ये 'फाइट नाइट'चे आयोजन  करणार टायगर आणि कृष्णा 
टायगर श्रॉफ आपल्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. नुकतेच त्याने बहीण कृष्णा श्रॉफसोबत मिळून मुंबईत मिक्स्ड मार्शल आर्ट प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. आता तो लवकरच फाइट नाइटचे आयोजित करणार असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील अनेक लोक आणि प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होतील. कृष्णा या कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यात भारताचे टॉप खेळाडू भाग घेतील. 

बातम्या आणखी आहेत...