आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actors Akshay Kumar, Kangana Ranot And Other Artists Also Pay Homage To Sheila Dikshit

शीला दीक्षित यांच्या निधनामुळे शोकाकुल झाले बॉलिवूड, अक्षय-कंगनासह इतर कलाकारांनीही दिली श्रद्धांजली 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : काँग्रेसच्या वरिष्ठ नेता शीला दीक्षित यांचे शनिवारी निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. सकाळी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना राजधानीच्या एस्कॉर्ट्स फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. उपचारादरम्यान दुपारी 3.15 वाजता शीला दीक्षितयांना कॉर्डियक अरेस्ट झाला. त्यांच्या निधनामुळे केवळ राजकीय नेतेच नाही तर बॉलिवूडकरही शोकाकुल झाले आहेत. अक्षय कुमार, मधुर भंडारकर आणि कंगना रनोटसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. 

 

अक्षय कुमारचे ट्वीट - 'शीला दीक्षित यांच्या निधनाची वार्ता ऐकून खूप दुःख झाले. त्यांनी आपल्या कार्यकाळदरम्यान दिल्ली प्रभावीपणे बदलले. त्यांच्या कुटुंबियांना देव धीर देवो.'

 

 

मधुर भंडारकर - 'दिल्लीच्या माजी सीएम शीला दीक्षित यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करतो आहे. त्या खूपच उत्तम नेता होता, त्यांना दिल्लीचा विकास करण्याबरोबरच दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठीही आठवले जाईल.'

 

 

भूमी पेडनेकर - 'त्या वास्तविक एक महान नेता होत्या. मी त्यांच्या कुटुंबीयांविषयी संवेदना व्यक्त करते. त्यांचे देशावर खूप प्रेम होते. तुमच्या आत्म्याला शांती मिळो.'

 

 

निमरत कौर - 'शीला दिक्षित यांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. त्या एक उत्तम महिला होत्या. येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे नेतृत्व एक उदाहरण आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.'

 

 

कंगना रनोट - 'शीला दीक्षित यांच्या निधनाची वार्ता ऐकून खूप खोलवर धक्का बसला. देव या काठीण प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि प्रियजनांना हिंमत देवो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.'

 

 

दिल्लीमध्ये दोन दिवस राजकीय दुखावटा... 
शीला दीक्षित या 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने 10 जानेवारीला त्यांना दिल्लीमध्ये पार्टीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. निजामुद्दीन येथील आवासमध्ये शीला दीक्षित यांचे पार्थिव देह रविवारी सकाळी 11.30 वाजता अंतिम दर्शनासाठी आणले जाईल. त्यानंतर निगम बोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. इकडे, केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये दोन दिवसाच्या राजकीय दुखवट्याची घोषणा केली आहे.