आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवूडच्या ग्लॅमरस विश्वात स्थायिक झालेले स्टार, सुपरस्टार्स नात्यांबाबत अत्यंत गंभीर असतात आणि भाऊ-बहिणीच्या स्नेहबंधनाच्या आठवणींना तर ते एखाद्या अमूल्य खजिन्याप्रमाणे संग्रहित करून ठेवतात. आठवणींच्या पेटाऱ्यातून त्यांनी काही किस्से खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी शेअर केले. तुम्हीदेखील जाणून घ्या आवडत्या अभिनेत्यांच्या रक्षाबंधनाच्या गोड आठवणींबाबत...
ऋतिक रोशन
हातातली राखी पाहून मी भावुक व्हायचो...
ऋतिक म्हणाला, रक्षाबंधनाबाबत नेहमीच भावनिक राहिलो. माझ्या बहिणी माझ्या हातावर राख्या बांधायच्या तेव्हा डोळ्यांतून पाणी यायचे. असे प्रत्येक वेळी व्हायचे. का कुणास ठाऊक, पण प्रत्येक वेळी मी खूप भावुक व्हायचो. भेटवस्तूबाबत सांगायचे झाल्यास मी स्टार झाल्यानंतर काहीतरी महागडी भेटवस्तू मी माझ्या बहिणींना दिलेली आठवत नाही. माझ्या मते, प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला सुरुवातीपासून तीच भेट द्यावी, जी नंतरच्या आयुष्यातही परवडेल. हे माझे वैयक्तिक मत आहे. याचा अर्थ असा नाही की, मी माझ्या बहिणींना कमी देतो.
परिणीती चोप्रा
भावंडे आधी गिफ्ट मागायची आता माझा अधिकार...
रक्षाबंधनाचा सण आम्ही संपूर्ण कुटुंबीय मिळून साजरा करतो. प्रत्येक रक्षाबंधनाला माझी भावंडे मिळून माझा खिसा रिकामा करत असत. माझे सर्व छोटे भाऊ माझ्याकडून पैसे घेऊन जायचे. १०० किंवा २०० रुपये जेवढे मिळतील त्यातून ते स्वत:साठी भेटवस्तू खरेदी करायचे. मात्र, आता माझ्यासाठीही काहीतरी खरेदी करून आणा, असे मी त्यांना सांगते. आधी ही सर्व भावंडे माझा फायदा घेत होते. आता मी त्यांचा फायदा घेते. या वेळी मी लंडनमध्ये शूटिंग करत आहे. तेथून आपल्या भावंडांना राखी पाठवेल.
श्रद्धा कपूर
भावंडांच्या भीतीने कॉलेजात कुणी माझ्या आसपासही फिरकत नव्हते...
माझा भाऊ सिद्धांत आणि चुलत भाऊ प्रियांक एकमेकांच्या खूप जवळ आहोत. आम्ही प्रत्येक रक्षाबंधन सण एकत्र साजरा करतो. मिठाई खायला मिळत असल्याने लहानपणी आम्ही रक्षाबंधन सणाबाबत खूप उत्सुक असायचो. खरं तर आम्हा तिघांना पेढे, मोतीचूरचे लाडू आणि इतर मिठाई खूप पसंत होती. सर्व भावंडे माझा खूप आदर करायचे. त्या सर्वांनी मला खेळणी, दागिने आणि भरपूर भेटवस्तू दिल्या होत्या. मी त्यांना कोणती भेटवस्तू दिली होती हे मला आठवत नाही. मात्र, आता मी मोठी झाल्यानंतर त्यांना त्यांचे आवडते खाद्यपदार्थ अवश्य आणून देते. माझी भावंडे माझ्यावर जिवापाड प्रेम करतात. माझ्यासाठी खूप प्रोटेक्टिव्ह राहत. त्यांच्या भीतीने कुणीच माझ्या आसपासही फिरकत नव्हते.
आयुष्मान खुराणा...
स्टार झाल्यानंतरही पोस्टाने येतात राख्या...
आम्ही दोन भाऊ आहोत. आम्हाला सख्खी बहीण नाही. चुलत बहिणी आहेत. स्टार बनल्यानंतरही चंदिगड, मुंबईतून राख्या पोस्टाने येतात. लहानपणी बहिणींना आई जे द्यायची तेच द्यायचो. या इंडस्ट्रीत माझी एकही मानलेली बहीण नाही. कारण राखी बांधली तर िचत्रपट कसा करणार? (हसत...)
प्रभास
पूर्वी राखीला १०-२० हजार रुपये द्यायचो आता पैशाचा विचार कधीच करत नाही...
आमच्याकडे रक्षाबंधन सण जल्लोषात सजरा केला जातो. करिअरच्या सुरुवातीला तर मी बहिणींना १० ते २० हजार रुपये देत होतो. आता तू बाहुबली झाला आहेस, असे जेव्हा त्या म्हणतात तेव्हा भेटवस्तूंची कोणतीच मर्यादा मी पाळत नाही. त्या जे काही मागतील ते सर्व मी देण्यास तयार आहे, असे मला वाटते. या सणाच्या भावनिक आठवणी जपून ठेवल्या आहेत. एकदा मी नववीत वसतिगृहात राहत असल्यामुळे रक्षाबंधन सणाला घरी जाऊ शकलो नव्हतो. त्या वेळी मी ओक्साबोक्शी रडलो होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.