Home | News | Bollywood Actress Amrita Singh birthday special

अमृता सिंग@61 : दोन दिवस अमृताच्या घरीच थांबला होता सैफ, अशी होती दोघांची 1st Date

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 09, 2019, 12:00 AM IST

जेव्हा अमृताला विनामेकअप बघून हैराण झाला होता सैफ...

 • Bollywood Actress Amrita Singh birthday special

  एन्टरटेन्मेंट डेस्कः आज (9 फेब्रुवारी) अमृता सिंह 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. पती सैफ अली खानपासून विभक्त झाल्यानंतर अमृताने दुसरे लग्न थाटले नाही. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे मार्ग विभक्त झाले आहेत, मात्र एक काळ असा होता, जेव्हा सैफ अमृताच्या प्रेमात आकंठ बुडाल होता. त्यांच्या पहिल्या डेटचा किस्सा खूप रंजक आहे. जेव्हा सैफने अमृताला बाहेर डिनरसाठी इनवाइट केले, तेव्हा मला बाहेर जाणे पसंत नाही, असे सांगून अमृताने त्याच्यासोबत डिनरसाठी जाण्यास नकार दिला होता.

  कधी झाली होती पहिली भेट...
  सैफ आणि अमृताची पहिली भेट 'ये दिल्लगी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. दोघे एका फोटोशूटच्या निमित्ताने भेटले होते. अमृताने सांगितल्याप्रमाणे, फोटोशूटवेळी जेव्हा सैफने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा तिने सैफकडे रागाने पाहिले. कारण त्यावेळी सैफ सिनेसृष्टीत नवखा होता, तर अमृता सीनिअर होती.

  जेव्हा अमृताला विनामेकअप बघून हैराण झाला होता सैफ...
  सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये सैफ आणि अमृता यांनी आपल्या फस्ट डेटच्या अनेक आठवणी शेअर केल्या होत्या. सैफने सांगितले, ''अमृताने बाहेर डिनरसाठी जाण्यास मला नकार दिला होता. मात्र नंतर तिने मला तिच्या घरीच डिनरसाठी इनवाइट केले. जेव्हा मी अमृताच्या घरी पोहोचलो, तेव्हा ती मेकअप काढत होती. तिला विना मेकअप बघून मी हैराण झालो होतो.''

  दोन दिवस अमृताच्या घरीच थांबला होता सैफ...
  सैफने सांगितल्याप्रमाणे, अमृताने फर्स्ट डेटलाच त्याला किस केले होते. फर्स्ट डेटनंतर सैफ दोन दिवस अमृताच्या घरीच थांबला होता. या दोन दिवसांत सैफ-अमृता यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले नव्हते. हे दोन दिवस आपण दुस-या खोलीत झोपल्याचे सैफ सांगायला मुळीच विसरला नव्हता.

  घरच्यांपासून लपून केले होते सिक्रेट वेडिंग..
  तीन महिने डेट केल्यानंतर सैफ आणि अमृताने 1991 मध्ये लपूनछपून लग्न केले होते. कारण दोघेही घरच्यांना घाबरले होते. त्याच कारण म्हणजे सैफ आणि अमृता यांच्या वयात असलेले अंतर. अमृता सैफपेक्षा वयाने तब्बल 12 वर्षे मोठी आहे. लग्नाच्या दोन दिवसाआधीच त्यांनी एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचे ठरवले होते.

  लग्नाच्या 13 वर्षांनी झाले विभक्त..
  13 वर्षे एकमेकांची साथ निभावल्यानंतर 2004 मध्ये सैफ हे दोघे जण कायदेशीररित्या विभक्त झाले. सैफ आणि अमृता यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफ तीन वर्षे स्विस मॉडेल रोसा कॅटलानोसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र फार दिवस हे नाते टिकू शकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले. 2007 मध्ये टशन या सिनेमाच्या सेटवर सैफची भेट करीनासोबत झाली. पाच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले होते.

Trending