• Home
  • News
  • bollywood actress and tmc mp nusrat jahan ties knot with his husband

wedding / लग्नानंतर पतीसोबत भारतात परतली ही अभिनेत्री, एअरपोर्टवर झाले जोरदार स्वागत

अभिनयानंतर आता राजकारणाच्या प्रवासाला केलीये सुरुवात, तृणमूल काँग्रेसची आहे खासदार 
 

दिव्य मराठी वेब

Jun 24,2019 03:25:00 PM IST

कोलकाता - बांग्ला चित्रपट अभिनेत्री आणि पश्चिम बंगालच्या बशीरघाट येथून तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहांने कोलकात्याचे बिझनसमन निखिल जैनसोबत 19 जून रोजी विवाह केला. आता ती पतीसोबत भारतात आली आहे. विमानतळावर या दाम्पत्याचे भव्य स्वागत करण्यात आले. निखिल जैन आणि नुसरत जहां दोघांची भेट गेल्या वर्षी दुर्गापुजादरम्यान झाली होती. यानंतर दोघांच्या भेटी-गाठी वाढतच गेल्या. लवकरच दोघेही रिलेशनशिपमध्ये आले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Towards a happily ever after with @nikhiljain09 ❤️

A post shared by Nusrat (@nusratchirps) on


अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेली खासदार नुसरत जहां लग्नानंतर भारतात परतली आहे. सोशल मीडियावर नुसरत आणि तिचा पती निखिल जैन दोघांचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो कोलकाता एअरपोर्टवरील आहेत.


विमानतळावर नुसरत आणि निखिल फुलांचे हार घातलेले दिसून आले. तर काही लोक त्यांच्या स्वागतासाठी त्यांनी बुके देत असताना दिसले. यावेळी नुसरतने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. तर निखिलने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजामा परिधान केलेला होता. नुसरतचा लुक खुपच साधा होता पण या अंदाजात अति सुंदर दिसत होती.


नुसरत आणि निखिल दोघांनी 19 जून रोजी विवाह केला होता. नुसरत आणि निखिलने हिंदू आणि क्रिश्चियन दोन्ही धर्माप्रमाणे विवाह केला. तुर्कीची राजधानी इस्तांबुल येथे हा विवाह सोहळा पार पडला. दोघांचे लग्न खूपच खासगी होते. त्यांच्यात लग्नात फक्त जवळच्या लोक सहभागी झाले होते.

X
COMMENT