आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेअभिनेत्री नगमाच्या चुलत भावाला पुण्यात अटक, प्रेयसीचा अमानुष छळ करत घरात डांबले..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- प्रियकराने प्रेयसीचा अमानुष छळ करून तिला तब्बल महिनाभर घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका उद्योगपतीच्या मुलाला अटक केली आहे. इराणी तरुणीची सुटका करण्यात आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली आहे.

 

धनराज मोरारजी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा धनराज मोरारजी टेक्स्टाईल लिमिटेड या कंपनीचे मालक अरविंद मोरारजी यांचा मुलगा आणि सिनेअभिनेत्री नगमाचा चुलत भाऊ आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, परवीन घेली (30) असे पीडित तरुणीचे नाव आहे. धनराज मोरारजी याने परवीन हिला मागील एक महिन्यापासून आपल्या घरात डांबून ठेवले होते. धनराज हा परवीनला बेदम मारहाणही करत होता. तिने कोणाशीही संपर्क साधू नये म्हणून तिचा मोबाईल धनराज याने आपल्या ताब्यात घेतला होता. तसेच तिचा पासपोर्टही त्याच्याकडेच आहे.

 

सोमवारी (ता.24) धनराज काही कामासाठी घराबाहेर गेला असता परवीनने मोबाईलमधून तिच्या इराणी मैत्रीणीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. परवीनच्या मैत्रिणीने मेसेज पाहिल्यानंतर तातडीने कोरेगाव पार्क पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाल करत धनराजला अटक केली. तसेच परवीनची सुखरुप सुटका केली आहे. परवीनला धनराजने बेदम मारहाण केली आहे. तिचा चेहरा सुजला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...