आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actress Priyanka Chopra And American Singer Nick Jonas Delhi Reception Photos

प्रियांका-निकच्या दिल्ली रिसेप्शनचे Photos, क्रिम-सिल्व्हर लहेंग्यात प्रियांका तर व्हेलवेट सूटमध्ये हॅण्डसम दिसला निक जोनास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीः अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्नानंतरचे पहिले रिसेप्शन 4 डिसेंबर रोजी दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये झाले. रिसेप्शनमध्ये प्रियांकाने क्रिम आणि सिल्व्हर कॉम्बिनेशनचा लहेंगा परिधान केला होता, तर निक जोनास नेव्ही ब्लू कलरच्या व्हेलवेट सूटमध्ये दिसला. यावेळी नवविवाहित दाम्पत्याने हात जोडून पाहुण्यांचे वेलकम केले. प्रियांका आणि निक यांचे जोधपूरच्या उम्मेद पॅलेस भवन येथे दोघांचे लग्न झाले. निक प्रियांकापेक्षा वयाने दहा वर्षांनी लहान आहे. 

 

1 आणि 2 डिसेंबर रोजी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धती झाले लग्न... 
लग्नात निक घोडीवरही स्वार झाला होता. उम्मेद भवन पॅलेसच्या बारादरीमध्ये रविवारी रात्री निक आणि प्रियांका यांनी सप्तपदी घेतल्या. पॅलेसच्या प्लाजा एरियात मंडप बनवण्यात आला होता. बंगळुरु येथून आलेले पंडीत चंद्रशेखर शर्मा यांच्यासह 11 पंडितांनी प्रियांका-निकच्या लग्नाचे मंत्र वाचले. निकने रात्री साडे आठच्या सुमारास अग्निला साक्षी मानून प्रियांकासोबत लग्नगाठ बांधली. लग्नासाठी निकने शेरवानी आणि चुडीदारला पसंती दिली. सजलेल्या घोडीवर बसलेला निक एखाद्या राजकुमारसारखा भासला. हत्ती-घोड्यांसह सनई चौघड्यांच्या सूरात निक वरात घेऊन लग्नमंडपी पोहोचला. लग्नात सहभागी झालेल्या देशी-परदेशी पाहुण्यांनी यावेळी डान्सही केला. सर्व पाहुणे ट्रेडिशन कॉश्च्युममध्ये दिसले. वधूच्या वतीने प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी वरातीचे स्वागत केले.

 

लग्नात सहभागी झाले होते हॉलिवूडचे गेस्ट... 

पीसीच्या लग्नात तिचे हॉलिवूडचे फ्रेंड्स अमेरिकन अॅक्टर ड्वेन जॉनसन, कॅनेडियन अॅक्ट्रेस लिली सिंह, इंटरनॅशनल अॅक्ट्रेस- डान्सर यास्मीन अल मसरी, अमेरिकन अॅक्टर जोनाथन टकर, अमेरिकन अॅक्ट्रेस एलिजाबेथ चेम्बर्स, अमेरिकन सिंगर मार्टिन गॅरिक्स, अमेरिकन सिंगर फ्रेंकी जोनास  सहभागी झाले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...