• Home
  • Party
  • Bollywood Actress Priyanka Chopra Kiss to Husband Nick Jonas in Mumbai Reception

स्टेजवर पोहोचताच प्रियांकाने / स्टेजवर पोहोचताच प्रियांकाने पती निक जोनासला केले Kiss, समोरुन वन्स मोअरचा आवाज येताच प्रियांकाने जोडले हात

निकयांकाच्या रिसेप्शनमध्ये जमली बॉलिवूडकरांची मांदियाळी, सलमान-कतरिनापासून ते रणवीर-दीपिकापर्यंत पोहोचले अनेक सेलेब्स...  

दिव्य मराठी वेब टीम

Dec 21,2018 02:30:00 PM IST

मुंबईः प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी बॉलिवूडकरांसाठी गुरुवारी ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी होस्ट केली होती. समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये ही ग्रॅण्ड पार्टी रंगली. पार्टीत प्रियांका पती निकचा हात पकडून स्टेजवर आली. यावेळी प्रियांकाने निकच्या गालावर चुंबन घेतले. प्रियांकाने निकला किस केल्यानंतर तेथे उपस्थित लोक वन्स मोअर, वन्स मोअर ओरडू लागले. तेव्हा प्रियांकाने हसून सगळ्यांना नमस्कार केला. प्रियांका आणि निक यांनी तेथे उपस्थित फोटोग्राफर्सची भेट घेतली.


सलमान-कतरिनापासून ते दीपिका-रणवीरपर्यंत सर्व पोहोचले...
निकयांकाच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानसह दीपिका-रणवीर, कतरिना कैफ, स्वरा भास्कर, परिणीती चोप्रा, राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा, करण जोहर, कियारा आडवाणी, यामी गौतम, डाएना पेंटी, नवाज़ुद्दीन सिद्दीकी, दीया मिर्झा, सोफी चौधरी, कार्तिक आर्यन, हरमन बावेजा, जॅकी भगनानी, डिनो मोरया, तनिषा मुखर्जी, गोविंदा, अनिल कपूर, अनुपम खेर, सतीश कौशिक, बॉबी देओल, पूजा हेगडे, राज बब्बर, अमीषा पटेल, साऊथ अॅक्ट्रेस तमन्ना भाटिया, पत्नी प्रियांकासोबत विवेक ओबरॉय, रवीना टंडन, जायरा वसीम, रणधीर कपूर, कंगना रनोट रेखा, विद्या बालन, संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्स पोहोचले होते.


1 आणि 2 डिसेंबर रोजी झाले प्रियांका-निकचे लग्न...
प्रियांका-निक यांनी जोधपूरच्या उम्मेद पॅलेस भवन येथे 1 आणि 2 डिसेंबर रोजी लग्न थाटले. 1 डिसेंबर रोजी दोघांचे ख्रिश्चन आणि 2 डिसेंबर रोजी हिंदू पद्धतीने लग्न झाले. लग्नानंतर 4 डिसेंबर रोजी प्रियांकाने नवी दिल्लीत रिसेप्शन दिले होते. त्याला पीएम मोदींनी हजेरी लावली होती. दुसरे रिसेप्शन 19 डिसेंबर रोजी मुंबईतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झाले. हे रिसेप्शन प्रियांकाने बिझनेस क्षेत्राशी संबंधत लोकांसाठी आयोजित केले होते.


लग्नात पोहोचले होते हॉलिवूड सेलेब्स...
प्रियांकाच्या लग्नात अमेरिकन अभिनेता ड्वेन जॉनसन, कॅनेडियन अभिनेत्री लिली सिंह, अभिनेत्री-डान्सर यास्मीन अल मसरी, अमेरिकन अभिनेता जोनाथन टकर, अमेरिकन अभिनेत्री एलिजाबेथ चैम्बर्स, अमेरिकन गायक मार्टिन गैरिक्स, अमेरिकन गायक फ्रेंकी जोनास सहभागी झाले होते.

X
COMMENT