आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actress Rakul Preet, Who Came From Bollywood In The South, Says There Is More Need For Networking In Bollywood Than In The South

दक्षिणेतून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री रकुल प्रीत म्हणते, दक्षिणेपेक्षा बॉलिवूडमध्ये नेटवर्किंगची जास्त गरज पडते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः या वर्षी 'दे दे प्यार दे' मध्ये अजय देवगण आणि तब्बूसारख्या दिग्गज कलाकारांसोबत झळकलेली रकुल प्रीत सिंह आता 'मरजावां' मध्ये दिसणार आहे. सध्या दक्षिणेपेक्षा बॉलिवूडवर जास्त फोकस करत आहे. आमचे प्रतिनिधी अमित कर्णसोबत तिची झालेली खास बातचीत...,

  • तू कोणत्या प्रकारचे चित्रपट निवडतेस ? चांगल्या प्रोजेक्टसाठी एखादा चित्रपट सोडू शकतेस का ?

- कधीच नाही. मी स्क्रिप्टच्या आधारावर चित्रपट निवडते. ही माझी सुरुवातीपासूनच पद्धत राहिली आहे. त्यामुळे पहिला चित्रपट 'यारियां' यशस्वी ठरला होता. मात्र मला तेव्हा कळले नाही, मी त्या चित्रपटानंतर दक्षिणेकडे गेले. त्याचा मला आताही काही पश्चात्ताप होत नाही. 'यारियां' नंतर लगेच साउथला गेले, ते माझ्या दृष्टीने चांगलेच होते. कारण जे होते ते चांगल्यासाठीच होते, अशी मानणारी मी आहे. तेव्हा मी न्यूकमर होते. योगायोगाने 'यारियां'ला रिलीज व्हायला बरीच वर्षे लागली आणि नंतर शूट झालेले साउथचे चित्रपट आधीच रिलीज झाले. ते हिटदेखील झाले त्यामुळे तेथेच राहणे मला योग्य वाटले. त्याच यशामुळे माझ्या आत्मविश्वास आला, तोच आज येथे मला कामी येत आहे.

  • दक्षिणेत काम कसे मिळते ? बॉलिवूडमध्ये जास्त नेटवर्किंगची गरज भासते का ?

- होय, हे खरं आहे. बॉलिवूडमध्ये नेटवर्किंगची खूपच गरज पडते. येथे आपल्याला प्रत्येक पुरस्कार समारंभ, पार्टीमध्ये जावे लागते. प्रत्येकाच्या संपर्कात राहावे लागते. तथापि, मी लोकांच्या मागे पडत नाही. मात्र जेव्हा आपण समोरचाच्या प्रकल्पात रस दाखवतो तेव्हा त्यांनाही ते आवडते. दक्षिणेत, मात्र एजंटद्वारे काम मिळते. तिथे राहण्यासाठी नेटवर्किंगची गरज पडत नाही. मी कुणाला काम मागत नाही, मात्र नसल्यावर नाहीच सांगते.

  • दिवाळी कशी झाली ? कुठे साजरी केली ?

- दिवाळीला प्रदूषण होते त्यामुळे मी शिलिमला गेले होते. मुंबईवरून साडेतीन तासांचा रस्ता आहे. तेथे एका रिसॉर्टमध्ये दिवाळी साजरी केली. तेथे आयुर्वेदिक उपचार घेतले. मित्रांसोबत तेथे गेले होत.े तेथे आम्ही हायकिंग, ट्रेकिंग आणि स्कीइंग केले. धबधब्यात मेडिटेशन केले. स्वत:ला ऊर्जावान केले. शहराच्या आवाज आणि प्रदूषणापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात दिवाळी साजरी केली.

  • पंतप्रधानांना भेटण्यास तूदेखील गेली होतीस, तेथे कशावर चर्चा झाली ?

- चित्रपटसृष्टीतील लोकांची सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ असते. लोक त्यांचे अनुकरण करतात. म्हणूनच स्वच्छता मोहिमेपासून ते पर्यावरण संरक्षणापर्यंतची जनजागृती करण्यात चित्रपट उद्योगातील लोक मोठी भूमिका बजावू शकतात. महात्मा गांधींविषयी लोकांना आकर्षित करण्यासाठीदेखील अभिनेते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. त्यामुळे यावर काम करत राहण्यास त्यांनी आम्हाला सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...