आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#RekhaBirthday:जास्त चित्रपट न करता आजही कशी मेंटेन आहे रेखाची लॅव्हिश लाइफस्टाइल, हे आहेत इनकमचे 9 सोर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 64 वर्षे पूर्ण केली आहेत. मुंबईतील वांद्रास्थित सी फेसिंग बंगल्यात रेखा वास्तव्याला असून या बंगल्याची किंमत कोटींच्या घरात आहे. तिचा हा बंगला फरहान अख्तर आणि शाहरुख खानच्या बंगल्यांपासून अगदी जवळ आहे. हिंदी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणारी ही अभिनेत्री आता मात्र फारशी चित्रपटांमध्ये दिसत नाही. किंवा एखाद्या जाहिरातीतही तिची झलक फॅन्सला दिसत नाही. त्यामुळे रेखा तिची लॅव्हिश लाइफस्टाइल कशी मेंटेन करते? हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. आज आम्ही तुम्हाला सांगतोय रेखाची लाइफस्टाइल आणि इनकमशी निगडीत काही खास गोष्टी..

 

1. प्रॉपर्टी
सूत्रांच्या माहितीनुसार, रेखाची मुंबई आणि दक्षिण भारतात बरीच प्रॉपर्टी आहे. तिने तिची घरं भाड्याने दिली आहेत. celebritynetworth.com नुसार रेखाची नेटवर्थ 40 मिलियन डॉलर अर्थात 296 कोटी रुपये आहेत. रेखाने 1980-81 मध्ये 4.25 लाख रुपये आयकर भरला होता. तर त्याचवर्षी अमिताभ बच्चन यांनी 4.16 लाख रुपये टॅक्स दिला होता. 


2. चित्रपट
आज रेखा चित्रपटांमध्ये दिसत नाही. पण एखाद दुसरी छोटेखानी भूमिका साकारण्यासाठी तिला आजही चांगले पैसे मिळतात. 

 

3. ब्रॅण्ड एन्डॉर्समेंट
रेखा फार क्वचित अॅड शूट करते, पण एन्डॉर्समेंटसाठी तिला चांगली फिस मिळते. तिचे फोटोज होर्डिंग आणि डिसप्लेसाठी वापरले जातात. त्यासाठी तिला एक निश्चित रक्कम दिली जाते. काही वर्षांपूर्वी बिहार सरकारने रेखाला बिहारची ब्रॅण्ड एम्बेसेडर बनवले होते.  

 

4. फिक्स्ड डिपॉझिट 
रेखा आगाऊ खर्च करत नाही. सेव्हिंगवर तिचा भर असतो. जेव्हा रेखा करिअरच्या पीकवर होती तेव्हा तिने बराच पैसा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकला होता. तो पैसा आजही तिच्याजवळ जमा आहे. त्याचेच व्याज आज लाखांच्या घरात तिला मिळतं. 

 

5. जुना स्टाफ
रेखाच्या स्टाफविषयी सांगायचे म्हणजे अनेक वर्षांपासून तिच्याजवळ एक ड्रायव्हर आणि एक वॉचमन आहे. तिची सेक्रेटरी फरजाना रेखासोबत सावलीप्रमाणे असते. स्वतःसाठी रेखाने फार स्टाफ ठेवलेला नाही. रेखाचा विश्वास मिडिल क्लास इंडियन व्हॅल्यूवर आहे. ती कायम साडीत दिसत असते. ती लेटेस्ट कार खरेदी करत नाही किंवा परदेशी हॉलिडेलाही जात नाही. केवळ अवॉर्ड फंक्शनच्या निमित्ताने ती परदेशी जात असते. ती केवळ गरजेच्या वस्तूंवर पैसे खर्च करत असते. 

 

6. राज्यसभा मेंबर
रेखा या राज्यसभा सदस्य आहेत. त्यांना वार्षिक पगार आणि भत्ते म्हणून 65 लाख रूपये मिळतत.  

 

7. गिफ्ट्स
रेखाला तिच्याजवळ असलेल्या जास्तीत जास्त साड्या या भेट रुपात मिळाल्या आहेत. तिच्याजवळ साड्यांचे एक मोठे कलेक्शन आहे. यामध्ये कांजीवरम, सिल्क, बनारसी, महेश्वरी या साड्या आहेत. ती कधीही डिझायनरकडून ड्रेसेस किंवा साड्या डिझाइन करुन घेत नाही.

 

8. टीव्ही शोजमध्ये हजेरी...
टीव्हीवर अनेक शोजमध्ये रेखाला आमंत्रित केले जाते. यासाठी तिला पैसे मिळतात. पण जेव्हा एखादा स्टार शोमध्ये त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जातो, तेव्हा त्याला त्याचे मानधन मिळत नाही. 


9. रिबन कटिंग सेरेमनी

मोठ्या कंपनी जेव्हा लाँच होतात, किंवा एखादा पब्लिक इव्हेंट आयोजित करतात, तेव्हा सेलिब्रिटींना आमंत्रित केले जाते. यासाठी त्यांना एक मोठी रक्कम दिली जाते. रेखालासुद्धा अशा अनेक इव्हेंट्सचे आमंत्रण मिळत असते. जेव्हा रेखा प्रायव्हेट इव्हेंट्स उदाहरणार्थ पार्टी, बर्थडेमध्ये जाते, तेव्हा तिला उपस्थिती लावण्यासाठी मानधन दिले जाते. 

बातम्या आणखी आहेत...