Home | Gossip | Bollywood Actress Tulip Joshi Does Not Seen In Films Long Time

सलमानसारख्या बड्या स्टारसोबत काम केल्यानंतरही FLOP ठरली ही अॅक्ट्रेस, बिझनेसमनबरोबर लग्न करून सांभाळतेय कोट्यवधींची कंपनी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 01:14 PM IST

ट्युलिपने 2002 मध्ये यश चोप्रांच्या 'मेरे यार की शादी है' या चित्रपटाद्वारे डेब्यू केले होते. तिचा हा चित्रपट हिट ठरला.

 • Bollywood Actress Tulip Joshi Does Not Seen In Films Long Time

  मुंबई - बॉलिवुडमध्ये अशा अनेक अॅक्ट्रेसेस आहेत, ज्या सुरुवातीला हिट चित्रपट दिल्यानंतरही इंडस्ट्रीत फार दिवस टिकू शकल्या नाहीत. त्यापैकीच एक नाव म्हणजे ट्युलिप जोशी. 11 सप्टेंबर 1979 रोजी मुंबईच्या एका गुजराती कुटुंबामध्ये (वडील गुजराती आणि आई अर्मेनियम) जन्मलेल्या ट्युलिपने 2002 मध्ये यश चोप्रांच्या 'मेरे यार की शादी है' या चित्रपटाद्वारे डेब्यू केले होते. तिचा हा चित्रपट हिट ठरला. पण त्यानंतर तिला एकाही चित्रपटात यश मिळाले नाही.

  ट्यूलिपने 2003 मध्ये 'मातृभूमी' चित्रपटात काम केले. स्त्री भ्रूण हत्या विषयावर आधारित या चित्रपटात तिने कल्किची दमदार भूमिका साकारली होती. यात कल्कि पाच भावांबरोबर लग्न करते. आठवड्याला वेगवेगळ्या भावांबरोबर तिला रात्र घालवावी लागते. तिच्या या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर तिने दिल मांगे मोर (2004) आणि शून्य (2006) सारखे चित्रपट केले पण तेही फ्लॉप ठरले.

  ट्युलिप अखेरची 2014 मध्ये आलेल्या सलमान खान स्टारर 'जय हो' या चित्रपटात कॅमियो रोलमध्ये झळकली होती. पण त्यात तिला फारसे कुणी ओळखले नाही. 2014-15 मध्ये ती टीव्ही शो 'एअरलाइन्स'मध्ये पायलटच्या भूमिकेतही होती.

  कॅप्टन विनोद नायरशी प्रेमानंतर केले लग्न

  चित्रपटांत काम करतानाच ट्युलिपचे कॅप्टन विनोद नायरशी सूत जुळले होते. विनोद यांनी प्रसिद्ध नॉव्हेल 'प्राइड ऑफ लॉयन्स' लिहिले आहे. दोघे सुमारे 4 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले. नंतर त्यांनी लग्न केले असे म्हटले जाते. पण त्यांच्या लग्नाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.

  कोट्यवधींच्या कंपनीची डायरेक्टर आहे ट्युलिप...
  विनोद नायर 1989 ते 1995 दरम्यान इंडियन आर्मीत होते. ते पंजाब रेजिमेंटच्या 19व्या बटालियनमध्ये होते. त्यानंतर आर्मी सोडून ते मुंबईत परत आले. सप्टेंबर 2007 मध्ये त्यांनी त्यांची ट्रेनिंग आणि मॅनेजमेंट कन्सल्टींग फर्म (KIMMAYA) सुरू केली. मीडिया सर्कलमध्ये त्यांना कॅप्टन विनोद नायर म्हणून ओळखले जाते. ट्युलिप जोशी सध्या विनोद नायर यांच्याबरोबर या कंपनीची डायरेक्टरही आहे.

  ट्यूलिपला असा मिळाला पहिला चित्रपट..

  ट्युलिपने जमनाबाई नरसी शालेतून शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने 2000 मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये सहभाग घेतला, पण तिला यश मिळाले नाही. 2002 मध्ये यशराज बॅनरच्या 'मेरे यार की शादी है' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. निर्माते आदित्य चोप्रा एका मित्राच्या लग्नात सहभागी झाले होते. तिथेच त्यांची नजर ट्युलिपवर पडली आणि त्यांनी तिला या सिनेमाच्या ऑडीशनसाठी बोलावले. सुरुवातीला ट्युलिपला हिंदी भाषा नीट बोलता येत नव्हती. यासाठी तिला फिरोज खान स्टुडिओत हिंदी भाषेचे धडे देण्यात आले होते.

  बॉलिवूडमध्ये यश मिळाले नाही तर दक्षिणेत केले चित्रपट
  ट्युलिपला बॉलिवूडमध्ये यश मिळाले नाही, तर तिने दाक्षिणात्य चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला होता. 2007 मध्ये तिने मल्याळम चित्रपट 'मिशन 90 डेज'मध्ये काम केले. त्यानंतर तिने तेलुगू चित्रपट 'कोंचेम कोथागा' आणि कन्नड चित्रपट 'सुपर'मध्ये काम केले.

  या चित्रपटांत केले आहे काम...
  ट्युलिपने करिअरमध्ये सुमारे 20 चित्रपटांत काम केले आहे. यात 'मेरे यार की शादी है', शिवाय 'व्हिलेन' 'मातृभूमी', 'दिल मांगे मोर', 'मिशन 90 डेज', 'धोखा', 'कभी कहीं', 'सुपर स्टार', 'डैडी कूल', 'रन-वे' यांचा समावेश आहे. तिने पंजाबी चित्रपट 'जग जियोदयां दे मेले', 'यारा ओ दिलदारा' मध्येही काम केले आहे.

Trending