आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Zeher And Aksar Films Fame Bollywood Actress Udita Goswami Become Mother And Blessed Baby Boy

दुस-यांदा आई बनली बॉलिवूडची अभिनेत्री, इमरान हाशमीसोबत बोल्ड सीन्स दिल्यानंतर आली होती चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. जॉन अब्राहम आणि इमरान हाशमीसोबत बोल्ड सीन्स देऊन चर्चेत आलेली अभिनेत्री उदिता गोस्वामी दूस-या वेळी आई बनली आहे. उदिताने बुधवारी मुलाला जन्म दिला आणि ही माहिती फिल्ममेकर मिलाप जावेरीने सोशल मीडियावर दिली. यासोबतच उदिताने पती मोहित आणि मुलगी देवीसोबतचा फोटो शेअर करत तिला मुलगा झाल्याचे सांगितले. यापुर्वी उदिताने सोशल मीडियावर मॅटरनिटी फोटोशूट शेअर केले होते. यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत होती. उदिताने 9 वर्षे डेटिंग केल्यानंतर 29 जानेवारी 2013 मध्ये बॉयफ्रेंड आणि फिल्म डायरेक्टर मोहित सूरीसोबत लग्न केले होते. या कपलची भेट 'जहर'च्या सेटवर झाली होती. हा चित्रपट मोहित सूरीने डायरेक्ट केला होता. 

 

आलियाची वहिनी आहे उदिता...
इमरान हा डायरेक्टर आणि प्रोड्यूसर महेश भटचा भाचा आहे. या नात्याने आलिया भट आणि पूजा भटचा तो भाऊ आहे. इमरान हाशमीच्या वडिलांचे नाव अनवर हाशमी आहे, ते अभिनेत्री पूर्णिमा दास वर्माचा मुलगा आहे. 
- तर पूर्णिमाची बहीण शिरीन मोहम्मद अली, या डायेक्टर महेश भट आणि मुकेश भटच्या आई आहेत. या नात्याने इमरान हाशमी मुकेश भटचा भाचा आहे आणि पूजा-आलियाचा कजिन आहे. यासोबतच डायरेक्टर मोहित सूरीही इमरानचा कजिन आहे आणि उदिता वहिनी आहे. या नात्याने मोहित, आलियाचा भाऊ आणि उदिता तिची वहिनी आहे. 
- लग्नापुर्वी उदिताने इमरानसोबत अनेक चित्रपटांमध्ये लव्ह मेकिंग सीन्स दिले. सलग्नानंतर दोघांचे नाते दिर-भावजयचे आहे. 


असे होते उदिताचे फिल्मी करिअर 
- उदिता गोस्वामीचा जन्म देहरादूनमध्ये 2 सप्टेंबर 1984 मध्ये झाला. उदिताची आई नेपाळी वंशातील होत्या. तर वडील गढवाली होते. उदिताचे बालपण काठमांडूमध्ये गेले आणि यानंतर उदिता आपल्या शिक्षणासाठी देहरादूनला परतली. 
- उदिता गोस्वामीने देहरादूनची प्रसिध्द स्कूल कँब्रियन हॉल आणि डीएव्ही पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. आपले ग्रॅज्यूएशन पुर्ण केल्यानंतर उदिता मुंबईला गेली. तिने सुरुवातीला चित्रपटांमध्ये भूमिका मिळवण्यासाठी कठोर संघर्ष केला. 
- उदिताने सुरुवातीला पेप्सी आणि टायटन वॉचसाठी कमर्शियल केले. 2003 मध्ये उदिताने पूजा भटचा चित्रपट 'पाप'मधून बॉलिवूड डेब्यू केला. या चित्रपटात तिच्यासोबत जॉन अब्राहिम होता. आपल्या बोल्ड सीन्समुळे उदिता पहिल्या चित्रपटातून खुप चर्चेत आली. 
- 2005 मध्ये उदिता, इमरान हाशमीसोबत 'जहर' चित्रपटात दिसली. 2006 मध्ये ती 'अक्सर' चित्रपटातील बोल्ड अवतारामुळे चर्चेत आली. उदीताच्या बोल्ड इमेजमुळे तिच्या फिल्मी करिअरवर परिणाम झाला. तिला एकाच धाटणीचे चित्रपट ऑफर होऊ लागले. 
- यानंतर उदिताचे 'अगर', 'किससे प्यार करूं' आणि 'फॉक्स' सारखे चित्रपट रिलिज झाले. पण हे चित्रपट कधी आले कधी गेले याविषयी प्रेक्षकांनाही कळाले नाही. चित्रपटातील करिअर संपल्यानंतर तीने फॅशन इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले आणि नंतर लग्न करुन चित्रपटांना रामराम ठोकला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...