• Home
  • News
  • Bollywood actress Urmila Matondkar arrives for visit to flood sufferers of Miraj Sangli

Bollywood / मिरज-सांगली येथील पुरग्रस्तांच्या भेटीसाठी पोहोचली बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, मदतीसाठी दिला दोन लाख रुपयांचा धनादेश

मिरज-सांगली येथील लोकांना उपयोगी साहित्य वाटप करताना उर्मिला मातोंडकर. मिरज-सांगली येथील लोकांना उपयोगी साहित्य वाटप करताना उर्मिला मातोंडकर.
राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसोबत पूरग्रस्तांना मदत करताना उर्मिला. राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसोबत पूरग्रस्तांना मदत करताना उर्मिला.

उर्मिलाने सर्वांना केले मदतीचे आवाहन 

दिव्य मराठी वेब

Aug 14,2019 05:27:34 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : राज्यातील कोल्हापूर-सांगली भागात महापूराने थैमान घातले होते. पूर ओसरत असला तरी येथील परिस्थिती सावरण्यास वेळ लागणार आहे. सध्या विविध संस्था, दानशूर व्यक्ती. सेवाभावी संस्था, राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील लोक मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. अशात पूरग्रस्तांसाठी मदत करावी असे आवाहान बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही केले होते. आता उर्मिला मातोंडकर मिरज सांगली येथी पुरग्रस्तांच्या भेटीसाठी पोहोचली आहे.

यावेळी उर्मिला मातोंडकरने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बाधित झालेल्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन लाख रुपयांचा धनादेश राष्ट्र सेवा दलाचे मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम यांच्या कडे सुपूर्द केला. राष्ट्र सेवा दलाच्या सैनिक असल्याचा ती अभिमानाने उल्लेख करते. पुरग्रस्तांना मदतीचे साहित्य घेऊन उर्मिला मातोंडकर आज सकाळी मिरज आणि इचलकरंजी येथील राष्ट्र सेवा दलाने सुरू केलेल्या मदत छावणी मध्ये भेट देण्यासाठी ती पोचली आहे. राष्ट्र सेवा दलाने इचलकरंजी, मिरज, गडहिंग्लज येथे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या दिवसापासून काम सुरू केले आहे. मिरज येथे सदाशिव मगदूम आणि त्यांची टीम, इचलकरंजी येथे संजय रेंदाळकर यांची टीम तर गडहिंग्लज येथे शहाजी गोंगाणे, हेरवाड येथे बाबा नदाफ यांची टीम काम करत आहे.

X
मिरज-सांगली येथील लोकांना उपयोगी साहित्य वाटप करताना उर्मिला मातोंडकर.मिरज-सांगली येथील लोकांना उपयोगी साहित्य वाटप करताना उर्मिला मातोंडकर.
राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसोबत पूरग्रस्तांना मदत करताना उर्मिला.राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसोबत पूरग्रस्तांना मदत करताना उर्मिला.
COMMENT