आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही चिमुकली आज आहे बॉलिवूडची फेमस अॅक्ट्रेस, एकेकाळी लागला होता सलमान खानच्या बहिणीचा संसार मोडल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  छायाचित्रात दिसणा-या या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का! ही चिमुकली आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असून आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. हिचे नाव आहे यामी गौतम. बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन यामीला अवघी सात वर्षे झाली आहेत, पण एवढ्या कमी कालवधतीत चार हिट सिनेमे तिच्या नावी आहेत. अलीकडेच आलेल्या आयुष्मान खुराणा स्टारर बाला या सिनेमातून तिने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 

यामीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्याविषयी... सोबतच श्वेता-पुलकितवरुन निर्माण झालेल्या वादाविषयी... 

  • खासगी आयुष्य

यामीचा जन्म 28 नोव्हेंबर 1988 रोजी हिमालच प्रदेशातील बिलासपूर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. तिचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तर थोरली बहीण सुरिली गौतम हीदेखील पंजाबी सिनेमांमधील अभिनेत्री असून प्रसिद्ध विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांची सून आहे. दिवंगत जसपाल भट्टी यांचा मुलगा  जसराज सिंग भट्टीसोबत 2013 मध्ये सुरिली विवाहबद्ध झाली. बालपणी यामीची आएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. मात्र वयाच्या 20 व्या वर्षी तिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी यामीने लॉचे शिक्षण अर्धवट सोडले. तिने मुंबईत पार्ट टाइममध्ये आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. तिला इंटेरिअल डेकोरेशन, वाचन आणि संगीताची आवड आहे. 

  • यामीचे करिअर

यामीने दुरदर्शनवरील 'चाँद के पार चलो' या मालिकेद्वारे आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती 'राजकुमार आर्यन' आणि 'ये प्यार ना होगा कम' या मालिकांमध्ये झळकली. 'विकी डोनर' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात ती अभिनेता आयुष्मान खुराणासोबत झळकली होती. या सिनेमासाठी अनेक पुरस्कार तिने आपल्या नावी केले. हिंदीच नव्हे तर तामिळ, तेलगू, पंजाबी, कन्नड आणि मल्याळम भाषांमधील सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'टोटल सियप्पा', 'अॅक्शन जॅक्सन', 'बदलापूर',  'सनम रे', 'जूनूनियत', ‘काबील’, ‘बदलापूर’, ‘बत्ती गुल मीटर चालू’  या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.  

  • जाहिरातींमधील प्रसिद्ध चेहरा

हळूहळू यामी जाहिरात क्षेत्रातीलदेखील प्रसिद्ध चेहरा बनली आहे. फेअर अँड लव्हलीची तिची जाहिरात चांगलीच गाजत आहे. या जाहिरातीत ती प्रेक्षकांना उत्पादकाविषयी चॅलेंज देताना दिसत असते. याशिवाय कॉर्निटो, सॅमसंग मोबाइल आणि शेवरोले या ब्रॅण्ड्ससाठीही ती जाहिरात करते. 

  • पुलकित सम्राटसोबत जुळले नाव

दिव्या खोसला दिग्दर्शित 'सनम रे' या सिनेमात यामी पुलकित सम्राटसोबत झळकली होती. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान यामी आणि गौतमचे सूत जुळले होते.  पुलकितचे लग्न अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत लग्न झाले होते. स्वतः सलमानने श्वेताचे कन्यादान केले होते. मात्र लवकरच त्यांचा संसार मोडकळीस आला. याला जबाबदार यामी असल्याचे म्हटले गेले होते. जेव्हा 'सनम रे' साठी यामी आणि पुलकित यांच्यावर किसींग सीन चित्रीत झाले, तेव्हापासून दोघांमध्ये जवळीक वाढली होते. हे दोघे बराच वेळ एकत्र घालवताना दिसत होते. शिवाय पुलकित फावल्या वेळेत यामीच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तिच्यासोबत क्वॉलिटी वेळ घालवताना दिसायचे.  पुलकितसोबत नाव जुळल्याने यामी चांगलीच वादात अडकली होती. 

  • पुलकितसोबत झाले ब्रेकअप

आता मात्र यामी आणि पुलकित एकत्र नाहीत.  पुलकित सम्राटचे आता 'पागलपंती'ची अभिनेत्री कृति खरबंदासोबत अफेअर असल्याची चर्चा आहे. अलीकडेच एका मुलाखतीत स्वतः कृती खरबंदाने पुलकितसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली आहे.