आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood Actress Zaira Wasim Can Be Seen In 'Big Boss 13', As The Makers Of The Show Approaches Her

बॉलिवूड सोडणारी अभिनेत्री जायरा वसीमला 'बिग बॉस 13' च्या मेकर्सने केले अप्रोच, जायरा बनणार का शोचा भाग ?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : जायरा वसीम मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूड सोडण्याच्या आपल्या निर्णयामुळे चर्चेत आहे. जायराने 30 जूनला सोशल मीडियावर सांगितले होते की, आता बॉलिवूडमध्ये काम करू इच्छित नाही कारण यामुळे माझ्या धर्मामध्ये हस्तक्षेप होत आहे. जायराच्या या निर्णयाला खूप विरोध झाला. सोबतच काम आणि धर्म जोडल्यामुळे तिची खूप निंदादेखील झाली. मात्र यामध्येच आता बातमी आहे की, जायराला वादग्रस्त रियलटी टीव्ही शो बिग बॉस 13 मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी अप्रोच केले गेले आहे. 

 

बिग बॉस 13 मध्ये दिनार का जायरा... 
एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, शोच्या मेकर्सने जायराला अप्रोच केले आहे पण आतापर्यन्त जायराने याबद्दल काहीही कंफर्मेशन दिले नाही की, ती हा शो करणार आहे की नाही. मात्र सांगितले जात आहे की, तिला ही ऑफर इंट्रेस्टिंग वाटली आहे. पण जर ती या शोला हो म्हणाली तर तिच्या फिल्म इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयाचे काय होईल, हे पाहण्यासारखे असेल. सूत्रानुसार, या शोमध्ये अनेक वादग्रस्त लोक भाग घेतात आणि यावेळी बॉलिवूडमध्ये जायरापेक्षा मोठा टॉकिंग पॉइंट दुसरा कोणताच नाही. 

 

सप्टेंबरपासून सुरु होणार आहे शो... 
शो 29 सप्टेंबरला प्रीमियर केले जाईल. यावेळी फॉरमॅटमध्ये थोडे बदलही पाहायला मिळणार आहेत. यावेळी कॉमनर्सला शोमध्ये जागा नाही मिळणार आणि केवळ सेलिब्रिटीच या शोमध्ये भाग घेऊ शकतील. शो 15 आठवडे चालणार आहे आणि याचा फिनाले 12 जानेवारी 2020 पर्यंत होईल. यावेळी बिग बॉसचे घर लोणावळ्या ऐवजी मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बनवले जात आहे. 

 

या सेलेब्सच्या नावांची आहे चर्चा... 
आतापर्यंत शोसाठी अंकिता लोखंडे, करण पटेल, विवेक दहिया, देवोलीना भट्टाचार्जी, माही विज आणि जय भानुशाली यांचे नाव समोर आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...