आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने घातली होती एवढी महागडी एंगेज्मेंट रिंग, प्रियांका-ऐश्वर्याच्या अंगठीची किंमत त्यापुढे काहीच नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः असिन थोट्टूमकल बॉलिवूडमध्ये मोठी स्टार होऊ शकली नाही. पण दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण गेल्या सात वर्षांपासून ती साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री आणि तीन वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. बॉलिवूडमध्ये आलेला तिचा शेवटचा चित्रपट 'ऑल इज वेल' हा 2015 मध्ये आला होता. तर 2011 मध्ये आलेल्या  'कावालन' (2011) या दाक्षिणात्य चित्रपटात ती अखेरची दिसली होती. अभिनय क्षेत्रापासून दुरावल्यानंतर असिनने लग्नाचा निर्णय घेतला आणि जानेवारी 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे को-फाऊंडर राहुल शर्मासोबत तिने लग्न केले. 


असिनच्या साखरपुड्याच्या अंगठीची झाली होती चर्चा... 
- लग्नात सर्वाधिक चर्चा असिनच्या एंगेज्मेंट रिंगची झाली होती. असे म्हटले जाते, की साखरपुड्याला राहुल शर्मा यांनी असिनला जी हि-याची अंगठी घातली होती, तेवढी महागडी अंगठी आजवर कुठल्या अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्यात घातलेली नाही. असिनच्या या अंगठीची किंमत तब्बल 6 कोटी रुपये होती. ही 20 कॅरेटची सॉलिटेयर रिंग असिनच्या पतीने तिला दिली होती आणि अंगठीवर 'AR' लिहिले होते. असिन आता सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 


एक नजर टाकुयात, अभिनेत्रींच्या एंगेज्मेंट रिंग आणि त्याच्या किंमतीवर... 

बातम्या आणखी आहेत...