आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी कंगाल तर कुणी दिसले भीख मागताना, चोरी करताना, अतिशय वाईट परिस्थितीत गेले या 10 स्टार्सचे अखेरचे दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकबॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत, जे गतकाळात प्रसिध्द होते. त्यांच्याकडे सर्वकाही होते, मात्र अचानक त्यांचे स्टारडम संपले आणि त्यांना रस्त्यावर यावे लागले. काही स्टार्स इतक्या वाईट अवस्थेत दिसले, की लोक त्यांना ओळखूसुध्दा शकले नाहीत. अनेकांकडे उपचारासाठीही पैसे नव्हते. यामध्ये परवीन बाबी, गॅविन पॅकर्डपासून ते श्रीवल्लभ व्यास, 'शोले'चे रहीम चाचा अर्थातच अभिनेते ए.के. हंगल यांच्या नावाचा समावेश आहे.

 

गॅविन पॅकर्ड

'त्रिदेव' (1989), 'चमत्कार' (1992), 'मोहरा' (1994) आणि 'खिलाडियों का खिलाडी' (1996) या चित्रपटांमध्ये झळकलेले अभिनेते गॅविन पॅकर्ड यांच्या अंत्यविधीला बॉलिवूडमधून एकही कलाकार उपस्थित नव्हता. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. तब्येतीने खंगल्यामुळे अखेरच्या काळात त्यांना ओळखणे कठीण झाले होते.  पॅकर्ड यांचा जन्म 8 जून 1964 रोजी कल्याण (महाराष्ट) येथे झाला होता. त्यांचे वडील अर्ल हे कॉम्प्युटर एक्सपर्ट होते तर आई बारबरा गृहिणी होत्या. बारबरा या कोंकणी होत्या. गॅविन यांचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. अखेरच्या काळात ते त्यांचे धाकटे भाऊ डेरिल पॅकर्डसोबत राहात होते. गॅविन यांचा एरिका पॅकर्ड आणि कॅमिली कायला पॅकर्ड या दोन मुली आहेत. 18 मे 2012 रोजी वसई येथे श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे गॅविन यांचा मृत्यू झाला होता. 

 

निशा नूर

हे नाव कदाचित कधी तुमच्या ऐकिवात आले नसावे. पण 80 च्या दशकातील हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अतिशय प्रसिद्ध नाव होते. निशा यांची लोकप्रियता एवढी होती, की रजनीकांत आणि कमल हासन यांच्यासारखे बडे स्टार्स त्यांच्यासोबत काम करण्यास इच्छूक असायचे. पण एका निर्मात्याने निशा यांना वेश्याव्यवसायात ढकलले आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले. वेश्याव्यवसायाने त्यांचे आयुष्य नरकापेक्षा वाईट झाले. इंडस्ट्रीतील लोक त्यांच्यापासून दूरावले. त्यातच त्यांना एड्स हा आजार झाला. हळूहळू निशा यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची झाली. अखेरच्या काळात निशा रस्त्यावर आढळल्या होत्या. त्यांच्या अंगावर मुंग्या लागल्या होत्या. आजुबाजुच्या लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. 2007 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घेऊया अशाच  आणखी 8 सेलिब्रिटींविषयी, ज्यांचे आयुष्य वाईट परिस्थितीतून गेले... 

 

बातम्या आणखी आहेत...