प्रेमाची व्याख्या / व्हॅलेन्टाईन डेला बॉलिवूड आर्टिस्टचा सर्व्हे, 75 टक्के जण म्हणाले - 'प्रेमच आहे सर्वकाही'

बॉलिवूड ताऱ्यांनी सांगितल्या प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 05:41:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : आपले पूर्वीपासूनच प्रेमाच्या कन्सेप्टवरच टिकलेले आहे आणि प्रेम नावाच्या शब्दाला वेगवेगळ्या पद्धतीने डिफाइन करण्याचा प्रयत्न नेहमीच आपल्या चित्रपटांमध्ये होत आला आहे. या व्हॅलेन्टाईन डेला दैनिक भास्करने याच बॉलिवूडकरांच्या मात्र प्रेमाचा काय अर्थ आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी एक मोठ्या पातळीवर सर्व्हे केला गेला, ज्यामध्ये असंम्हि संपूर्ण बॉलिवूडकरांना त्यांच्या शब्दात प्रेमाची व्याख्या विचारली. चित्रपटात प्रेमाची अनेक रूपे दाखवणाऱ्या आपल्या बॉलिवूड कम्यूनिटीच्या एका मोठ्या भागाने या सर्व्हेमध्ये सांगितले, या जाणिवेची सर्वात लहान डेफिनेशन तर हीच होऊ शकते की, ‘प्रेमच सर्वकाही आहे’. सोबतच त्यांनी हेदेखील स्वीकारले की, ही जाणीव शब्दांच्या जाणिवेत बंधने खूप काठी आहे.


कसा केला सर्व्हे...


आम्ही बॉलिवूडकरांसमोर प्रश्न मांडला की, त्यांच्यानुसार प्रेमाची व्याख्या काय आहे. ते याला एका ओळीत व्यक्त करू शकतात. या सर्व्हेमध्ये अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, प्रोड्यूसर्स, सिनेमॅटोग्राफर्स, कोरियोग्राफर्स, ड्रेस डिझायनर्स, मेकअप आर्टिस्ट, रायटर्स, सिंगर्स, कम्पोजर्स, म्यूझिशियंस, टेक्निशियंस इत्यादी कलाकारांना सामील केले गेले. एकूण 500 आर्टिस्टला आम्ही या सर्व्हेमध्ये सामील केले.


हा आहे रिझल्ट...

 • लव्ह इज एव्हरीथिंग, याला शब्दात बांधले जाऊ शकत नाही : 75 टक्के
 • प्रेम मैत्री आहे : 8 टक्के
 • प्रेम सर्वात प्रेमळ नाते आहे : 7 टक्के
 • इतर 10 टक्के कलाकारांनी आपापल्या पद्धतीने प्रेमाची वेगवेगळी व्याख्या सांगितली.

प्रेमालाच सर्वकाही मानणारी काही नावे...


सारा अली खान, वरुण धवन, प्रीतिश नंदी, हरिहरन, ललित पंडित, मेहुल कुमार, कैलाश खेर, डेलनाज ईरानी, जुबिन नौटियाल, गीता कपूर, पुलकित सम्राट, रोहन शाह, सायंतनी घोष, लव्ह सिन्हा, जतिन सरना, ताहिर राज भसीन, विपुल रावल.


काही इंटरेस्टिंग डेफिनेशन...

 • सिंगर अनुजा सहाय - लव्ह काही नाहीये, हा केवळ एक भ्रम आहे.
 • राहुल रॉय - लव्ह इज स्वीट अँड पेनफुल, हे गोडही आहे आणि वेदनाही देते.
 • अदनान सामी - प्रेम देवाने दिलेली भेट आहे.
 • भाग्यश्री - प्रेम अशी लाइफ लाइन आहे, जे आपले वर्तमान सावरते. गेलेल्या काळाला एक सुखद आठवण बनवते आणि येणाऱ्या क्षणांना स्वप्नासारखे सुंदर बनवते.
 • दिग्दर्शक अनिल शर्मा - प्रेम ते आहे जेतुम्हाला कुणासाठी काहीही करण्यात आनंद देते.
 • हिमेश रेशमिया - प्रेम दिव्यता आहे.
 • सुरेश ओबेरॉय - प्रेम अशी स्वीकृती आहे, जी सर्व अटींच्या पलीकडची आहे.
 • अन्नू कपूर - प्रेम तर बहुआयामी आहे.
 • कॉमेडियन भारती सिंह - मैत्रीचं खरे प्रेम आहे.
 • तुषार कपूर - प्रेम मैत्रीबरोबरच विश्वासाचेही नाव आहे.
 • अदा खान - या जाणिवेची कधीच शब्दांची गरज पडत नाही.
 • दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री - आपल्या आत्म्याशी जोडले जाण्याचे मीडियम आहे लव्ह.
 • सोनू सूद - प्रेम सर्वत उत्तम नातेदेखील आहे.
 • दिलीप ताहिल - लव्ह इज अ बेस्ट ऑफ टाइम
 • दिलीप जोशी (जेठालाल) - प्रेम तर जिलेबी-फाफडा आणि एक उत्तम नाते आहे.
 • मनारा चोप्रा - प्रेम मैत्री आहे, मैत्रीनेच प्रेमाची सुरुवात होते.
 • अभिषेक दुहान - लव्ह इज रिस्पेक्ट.
 • शिवानी कश्यप, सिंगर - प्रेम रिस्पेक्ट आहे.
 • संयोगित मायर - प्रेम जमिनीवरील स्वर्ग आहे.
 • अनेरी वजानी, अभिनेत्री - आयुष्यातील सर्वात प्रेमळ मैत्रीचे नावच प्रेम आहे.
 • मुग्धा छापेकर - प्रेम तर त्यागाचे नाव आहे.

बॉलिवूड ताऱ्यांनी प्रेमाच्या या व्याख्या सांगितल्या...


सारा अली खान.... प्रेम एक जाणीव आहे, ज्याचा व्यक्ती अनुभव घेऊ शकतो. हे समजून घेण्यात वर्षे जातात. चित्रपटात प्रेम खूप कमी वेळेत दाखवले जाते, कारण त्यामध्ये कथेला एका शेवटपर्यँत पोहोचवण्याची गरज असते. प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती वेळेनुसार बदलत राहतात, पण त्याची इथोस एकच राहाते. प्रेमाशिवाय आयुषय जगण्यात काही आनंदच नसतो.


वरुण धवन.... प्रेम तर खूपच सुंदर असते. त्याच्याविना आयुष्य अधुरे राहते. इमोशन तुम्ही तुमच्या चित्रपटात टाका किंवा खऱ्या आयुष्यात, प्रेमाशिवाय काहीही होत नाही. कामही खूप प्रेमानेच करावे लागते. प्रेम तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत टाकावेत लागते. बाकी यावर्षी वरुणची नवरी येईल की, नाही हे मी नाही सांगू शकत कारण त्याला अजून वेळ आहे.


श्रद्धा कपूर.... मी जेव्हा शाळा-कॉलेजमध्ये होते, तेव्हा व्हॅलेन्टाईन डे खूप एक्सायटिंग वाटायचा. जेवढेही ओळखणारे लोक होते, सर्वांना हॅपी व्हॅलेन्टाईन डे विश करायचे. त्या वयापासूनच कळत होते की, व्हॅलंटाई केवळ जे तुम्हाला आवडते त्याच्यासाठीच नाही तर त्या झोनपेक्षा वेगळ्या इतर लोकांसाठी देखील असतो. त्या दिवशी केवळ मी कुणाला गिफ्ट दिले की नाही ? हे मला आठवत नाही. पण मला शाळेत गुलाबाची फुले खूप मिळायची.


अनन्या पांडे.... माझे ऑपिनियन कदाचित थोडे डिफरेंट साउंड करेल, पण प्रेम तर माझ्यासाठी मैत्री आहे, जर नात्यामध्ये चांगली मैत्री नाहीये तर ते नाते निरर्थक आहे. मी त्याच्यावर प्रेम कारेन जो मला आयुष्यभर हसवत राहील. प्रेमाचा अर्थ लाफ्टर, लॉयल्टी, आणि ट्रस्ट आहे.


कृती खरबंदा.... आयकॉनिक चित्रपट 'कुछ कुछ होता है' लहानपणी पाहायचे. त्यातील एक डायलॉग 'प्यार दोस्ती है' ऐकल्यानंतर मला प्रेमाबद्दल आयडिया आली. प्रेम तर येत जात राहाते. पण मैत्री नेहमी टिकून राहाते. अपजन ज्याच्यावर प्रेम करतो. त्याच्यात काही अभाव असल्यास तेही आपल्याला स्वीकारता आले पाहिजे.


टाइगर श्रॉफ.... मला माझ्या पार्टनरमध्ये अनकंडीशनल आणि सेल्फलेस प्रेम करण्याची क्वालिटी पाहिजे. इच्छा आहे की, ती अंडरस्टँडिंग असावी आणि तिच्या लव्ह अँड केअरचा काहीही वेगळा उद्देश्य असू नये. जी माझ्या सर्वात कठीण काळातही माझी सर्वात जास्त साथ देईल. मला खूप विचित्र वाटते जेव्हा व्हॅलेन्टाईन डेला केवळ मुलगा मुलीचे प्रेम किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडपर्यंतच मर्यादित केले जाते. विशेषतः लग्नानंतर जेव्हा लोक बदलतात आणि आपल्या पॅरेंट्सबद्दल त्यांचा दृष्टिकोन बदलतो. ते मला खूप विचित्र वाटते. कोणत्याही व्यक्तीसाठी जगात सर्वात आधी आईवडिल असले पाहिजे. त्यांच्यावर अमर्यादित प्रेम केले गेले पाहिजे. प्रेमाच्या या सोहळ्याची व्यापतो वाढवण्याही गरज आहे. आधी तर आपल्या पॅरेंटसवर प्रेम करा. मग स्वतःवर. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकता तर त्या कंडीशनमध्येच तुम्ही इतरांमध्ये प्रेम वाटू शकता. राहिला प्रश्न चार वर्षे सोमवारचे व्रत केल्याचा तर ते मी व्रत मी यासाठी नव्हते केले की, मला मनासारखी मुलगी मिळावी. त्या चार वर्षात मी सोळा सोमवारपेक्षा जास्त व्रत केले पण त्याचा उद्देश वेगळा होता. सध्या तर मी ते व्रत करू शकत नाहीये. असे यासाठी की, मी माझ्या डेली लाइफमध्ये डिसिप्लिन राहू शकत नाहीये. त्यासाठी मला परत लाइनवर यावे लागेल.

X