आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील एन्काउंटरप्रकरणी पोलिसांच्या कार्याचे सेलिब्रिटींकडून कौतुक, म्हणताहेत जय हो.. न्याय मिळाला!

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

हैदराबादः पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कारप्रकरणातील चारही आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला आहे. पोलिस तपासावेळी आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात चौघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर समाजाच्या सर्व स्तरातून या एन्काउंटरचे समर्थन केले जात आहे. पीडित तरुणीला न्याय मिळाल्याची भावना समाजातून व्यक्त होतेय. सोशल मीडियावर चित्रपट कलाकार पोलिसांच्या या कार्याचे स्वागत केले आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करुन माझ्यासोबत म्हणा जय हो... असे ट्विट केले आहे. 

 • हे आहेत बॉलिवूड स्टार्सचे ट्विट...
 • अभिनेते ऋषी कपूर यांनी हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
 • अभिनेत्री हंसिका मोटवानीने न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली आहे.

 

 • चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी लिहिले, एन्काउंटरमध्ये चारही बलात्का-यांना मारण्यासाठी हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन. त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता. आता जे लोक पोलिसांच्या कार्याला विरोध करत आहेत, त्यांनी गप्प बसायला हवे.
 • दाक्षिणात्य अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने ट्विट करताना लिहिले, बलात्कारासारखा गुन्हा केल्यानंतर तुम्ही किती काळ पळू शकता... हैदराबाद पोलिस थँक यू...
 • दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली आहे.
 • दाक्षिणात्य अभिनते नागार्जुन यांनी लिहिले, सकाळी उठल्यानंतर ही बातमी ऐकली. न्याय मिळाला.
 • अभिनेत्री समांथा प्रभूने लिहिले, आय लव्ह तेलंगाणा... कधीकधी भीती हाच एक उपाय असल्याचे दिसते.
 • ज्यु. एनटीआरने ट्विट केले, न्याय मिळाला. रेस्ट इन पिस दिशा..
 • नक्की काय घडले होते...

काल (गुरुवारी) रात्री पोलिस चारही आरोपींना घटनास्थाळी घेऊन गेले होते. नक्की काय काय घडले हे जाणून घेण्यासाठी त्यांना पोलिस बंदोबस्तामध्ये घेऊन जाण्यात आले होते. मात्र ज्यावेळी त्यांना काय घडले हे सांगण्यासाठी मोकळे सोडण्यात आले तेव्हा त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांनी त्यांना थांबवण्यास सांगितले. मात्र अनेकदा सांगूनही ते थांबले नाही तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्येच चौघाचाही मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...