Home | Gossip | Bollywood Celebrities Talking About Ghosts And Fear

गोविंदा, सोहापासून ते बिपाशा,वरुण धवनपर्यंत, या सेलिब्रिटींचा झाला आहे भूत-चेटकिणीशी सामना!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 05, 2018, 02:40 PM IST

अनेक सेलिब्रिटींनी भूत आणि चेटकिण अस्तित्वात असल्याचा अनुभव घेतला आहे.

 • Bollywood Celebrities Talking About Ghosts And Fear

  मुंबई: बॉलिवूड स्टार्सचा भूतावर विश्वास आहे का? किंवा त्यांचा सामना कधी भूताशी, चेटकिणीशी झाला होता का? त्यांना कशाची भीती वाटते? याविषयी जाणून घेण्यास सर्वसामान्य नक्कीच उत्सुक असतात. अभिनेत्री सनी लिओनी सांगते, की तुला भूताची एवढी भीती वाटते, की घरी एकटी असल्यास ती संपूर्ण घराचे लाइट ऑन करुन झोपते. तर गोविंदाने सांगितल्यानुसार, त्याचा चक्क चेटकिणीशी सामना झाला होता.


  गोविंदाच्या छातीवर बसली होती चेटकिण...
  भूतांविषयीचा अनुभव शेअर करताना गोविंदाने सांगितले होते, "होय, मला भूतांची भीती वाटते. प्रत्यक्षात भूत असतात, यावर माझा विश्वास आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात मी भूत पाहिला आहे. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण आपण मनुष्यासोबत लढू शकतो, पण भूतांना सामोरे जाणे अशक्य आहे. या कारणाने मी भूतांना घाबरतो."


  एक अनुभव शेअर करताना गोविंदाने सांगितले, "काही वर्षांपूर्वी आम्ही पहाडी भागात चित्रपटाचे शूटिंग करत होतो. मी ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो, तेव्हा मला विचित्र भास होत होते. एकदा मी भासांकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या खोलीत जाऊन झोपलो. अचानक रात्री मला जाग आली तेव्हा बघतो काय तर एक म्हातारी स्त्री माझ्या छातीवर बसली होती. हे बघून मी खूप घाबरलो. मी माझ्या शेजारचा नाइट लँप लावला. पहिले मला भास होतोय, की काय असे वाटले. पण उठल्यावर पाहतो तर काय मी झोपताना अस्तव्यस्त असलेले सामान अगदी त्याच्या जागेवर लावले होते. हे बघून मी खूप घाबरलो होतो. मी तेथून पळ काढला आणि मुंबईत परतो. तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही."


  पुढे वाचा, बिपाशा बसूसह इतर सेलेब्सचा कधी झाला होता चेटकिण आणि भूताशी सामना...

 • Bollywood Celebrities Talking About Ghosts And Fear

  वरुण धवन 
  'एबीसीडी 2' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात वरुण धवन एका हॉटेलमध्ये वास्तव्याला होता. त्यावेळी हॉटेलच्या रुममध्ये त्याला कुणीतरी गाणी गात असल्याचे जाणवले होते.

   

 • Bollywood Celebrities Talking About Ghosts And Fear

  सोहा अली खान 
  सोहा अली खानचा भूतांवर विश्वास आहे. तिने तिचा अनुभव शेअर करताना सांगितले होते, "एकदा मी आणि माही गिल 'गँग ऑफ घोस्ट्स'च्या शूटिंगसाठी गुजरातच्या एका हवेलीत गेलो होतो. शूटिंगचा शेवटचा दिवस होता आणि आम्ही दोघी सेटवर गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा अचानक आम्हाला जोरजोरात फर्नीचर हलण्याचा आवाज ऐकू आला. सुरुवातील यूनिटमधील लोक फर्निचर हलवत असतील, असे आम्हाला वाटले. पण तिथे आमच्या दोघींव्यतिरिक्त कुणीच नव्हते. त्यामुळे आम्ही अक्षरशः खूप घाबरलो. आमचा जणू कुणी पाठलाग करतोय, असे आम्हाला वाटले होते."

   

 • Bollywood Celebrities Talking About Ghosts And Fear

  इमरान हाश्मी 
  भूताचा अनुभव शेअर करताना इमरान हाश्मी सांगितले होते, "होय, माझा भूत अस्तित्वात असतात, यावर संपूर्ण विश्वास आहे. एकदा मला त्याचा भाससुद्धा झाला होता. माथेरानमध्ये मित्रांसोबत सुटी एन्जॉय करायला गेले होतो, जिथे आम्ही थांबलो होतो, ते ठिकाण अतिशय भीतीतदायक होते. आम्हा अचानक भीतीदायक आवाज ऐकू येऊ लागले होते.पहिल्यांदा कुणी थट्टा करत असावे, असे आम्हाला वाटले होते. आम्ही बाहेर येऊन पाहिले तर एक सावली आमच्याजवळून गेली, भीतीमुळे आम्ही सर्व मित्रांनी एका खोलीत स्वतःला बंद करुन घेतले होते. रात्रभर आम्हाला रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागले होते. सकाळ होताच आम्ही सर्व मित्र तेथून निघून मुंबईत परत आलो."

   

 • Bollywood Celebrities Talking About Ghosts And Fear

  बिपाशा बसू
  अभिनेत्री बिपाशा बसू म्हणाली,  "होय, माझा भूत असतो, यावर विश्वास आहे. मी माझ्या करिअरमध्ये अनेक हॉरर चित्रपट केले. लोक मला हॉरर क्वीनसुद्धा म्हणतात. पण हॉरर चित्रपटाचे शूटिंग करुन घरी परतल्यानंतर माझी काय अवस्था असते, हे मी कुणालाही शब्दांत सांगू शकत नाही."


  "मी एखादा भीतीदायक सीन करुन घरी परतते, तेव्हा एकटी मुळीच राहात नाही. आई किंवा बहिणीला माझ्याजवळ झोपायला सांगते. खासगी आयुष्यात मी भूत पाहिला आहे. मुंबईतील मुकेश मिलमध्ये 'गुनाह' या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात मला भूताचा भास झाला आहे. मी ज्या ठिकाणी संवाद पाठ करत बसले होते, तेव्हा मला संवाद पाठच होत नव्हेत. मग मी दुस-या ठिकाणी जाऊन संवाद पाठ करु लागले तर लगेच पाठ होत होते. त्या एका विशिष्ठ ठिकाणीच मला बैचेन वाटू लागले होते. मुकेश मिलमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याचे मला नंतर दिग्दर्शकाने मला सांगितले होते. हा विषय तिथेच संपला होता. पण 10 दिवसांनी एक तरुणी तिच्या टीमसोबत शूटिंगसाठी त्या ठिकाणी गेली होती. तर एका भूताने तिला पकडले. ती एवढी भीतीदायक दिसू लागली होती, की लोक तिला बघून घाबरले होते. ती बेशुद्ध पडली. नंतर कळले की तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. हे सर्व ऐकून पुन्हा कधीही मुकेश मिलमध्ये शूटिंग न करण्याचा मी निर्णय घेतला."

 • Bollywood Celebrities Talking About Ghosts And Fear

  नवाजुद्दीन सिद्दीकी
  'आत्मा' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मागे भींतीवर असलेल्या एका फोटो फ्रेमला अचानक तडा गेला होता. एका मुलाखतीत नवाजुद्दीनने ही गोष्ट शेअर केली होती. 

   

Trending