आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 25 व्या तर कुणी 30 व्या वर्षी, जेव्हा तरुण वयात या सेलिब्रिटींनी केली आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः टीव्ही अभिनेता कुशाल पंजाबीने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह पाली हिल येथील घरात पंख्यावर  लटकलेला आढळला. पोलिसांनी मृतदेहाजवळून सुसाइड नोटही जप्त केली. कुशालचे वयाच्या 37 व्या वर्षी निधन झाल्यामुळे टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. याआधीही चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी अगदी लहान वयातच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.


अशा काही सेलिब्रिटीजवर एक नजर टाकुया... 

  • प्रत्युषा बॅनर्जी
  • 'बालिका वधू'ची 'आनंदी' उर्फ प्रत्युषा बॅनर्जी 1 एप्रिल 2016 रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटवर गळफास घेतलेल्या अवस्थे आढळून आली होती. कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तिचा प्रियकर राहुल राज सिंहवर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. प्रत्युषावर प्राणघातक हल्ला केल्याचाही राहुलवर आरोप होता. मृत्यूच्या वेळी प्रत्युषा 25 वर्षांची होती.

  • जिया खान
  • 'निशःब्द', हाऊसफुल 'आणि' गजनी 'सारख्या चित्रपटात झळकलेली जिया खान 3 जून 2013 रोजी वयाच्या 25 व्या वर्षी जुहूच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली होती. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे वाटले होते. पण नंतर जियाच्या आईने सूरज पंचोलीवर जियाच्या खुनाचा आरोप केला. वृत्तानुसार मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी जिया गर्भवती होती. प्रियकर सूरजने जियाला गर्भपात करण्याचे औषध दिले. सूरजने टॉयलेटमध्येही भ्रूण टाकले होते. असे म्हणतात की, या घटनेनंतर जिया पुरती कोलमडली होती. सूरजनेही तिच्यापासून अंतर निर्माण करण्यास सुरुवात केली होती, त्यानंतर जिया नैराश्यात गेली. काही दिवसांनी तिने आत्महत्या केली.

  • सिल्क स्मिता
  • 3 सप्टेंबर 1996 रोजी दक्षिण चित्रपटातील अभिनेत्री सिल्क स्मिताचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेला आढळला. त्यावेळी ती 35 वर्षांची होती. पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्या सांगून बंद केले. अनेकांचा असा विश्वास होता की, तिच्या मृत्यूमागे कारण काहीतरी वेगळंच आहे. असे म्हणतात की, सिल्कने चित्रपटांमधील अभिनय आणि गाण्यांमधून चांगली कमाई केली. तिच्या जवळच्या काही मित्रांनी तिला निर्माता बनून पैसे कमवण्याचे आमिष दाखविले. पहिल्या दोन चित्रपटात तिचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. निर्माता म्हणून त्यांचा तिसरा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. चित्रपटांमधील तोट्यांचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला आणि ती मानसिकदृष्ट्या दुर्बल झाली होती.

  • कुलजित रंधावा
  • 1 जानेवारी 1976 रोजी पश्चिम बंगालच्या राणीगंज येथे जन्मलेली कुलजित रंधावा ही एक टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून परिचित होते. विशेषत: टीव्ही मालिका 'स्पेशल स्क्वाड' आणि 'सी.ए.टी.एस.'द्वारे तिने स्वतःची छाप पाडली 2006 मध्ये तिच्या अचानक मृत्यूच्या बातमीने मॉडेलिंग इंडस्ट्रीसह टीव्ही जगाला आश्चर्यचकित केले. वयाच्या 30 व्या वर्षी तिने मुंबईच्या जुहू येथील अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. आपल्या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले की, “जीवनाचा दबाव मी सहन करू शकत नाही, म्हणून आत्महत्येसारखी पाऊल उचलत आहे.”

  • नफिसा जोसेफ
  • टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल नफिसा जोसेफ हिचा मृत्यू एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही. 1997 मध्ये मिस इंडिया युनिव्हर्सचा मुकुट मिळविणा-या नफिसाने 2004 मध्ये वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी घेतली होती. नफिसाने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती, परंतु तिने अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख निर्माण केली. एमटीव्हीवर शो होस्ट करण्याचीही तिला संधी मिळाली होती. नाफीसा बॉलिवूड चित्रपट 'ताल' आणि टीव्ही शो 'सी.ए.टी.एस.' मध्ये देखील दिसली होती.

  • विवेका बाबाजी
  • 2002 मध्ये आलेल्या 'ये कैसी मोहब्बत' हा एकमेव चित्रपट होता ज्यामध्ये विवेका बाबाजींनी अभिनय केला होता. 37 वर्षीय विवेका 25 जून 2010 रोजी मुंबईतील तिच्या खोलीत पंख्याला लटकलेली आढळली होती. या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विवेकाचा आत्महत्येचा हा तिसरा प्रयत्न होता. ज्यामध्ये ती यशस्वी झाली. 1993 मध्ये मिस मॉरिशस वर्ल्डचा किताब पटकावणा-या विवेकाने आत्महत्या का केली हा सर्वांच्या चर्चेचा विषय राहिला. आपल्या प्रियकरापासून विभक्त झाल्यानंतर ती नैराश्यात राहिल्याच्या बातम्या आल्या आहेत आणि कदाचित म्हणूनच तिने स्वत:चे आयुष्य संपवले होते.

  • कुणाल सिंग
  • अभिनेता कुणाल सिंग खासकरुन तामिळ सिनेमात काम करण्यासाठी ओळखला जात होता. त्याने 'कथार धिनम' (1999) द्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटात सोनाली बेंद्रे त्याच्यासोबत होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती पण त्यानंतर त्याला सतत अपयशाला सामोरे जावे लागले. 7 फेब्रुवारी 2008 रोजी कुणाल त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये एका गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या का केली हे कोणालाही समजू शकले नाही, परंतु चित्रपटांमध्ये सतत अपयश आल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तविला गेला. मृत्यूच्या वेळी तो 30 वर्षांचा होता.