आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींची मुलगी ईशाच्या एंगेजमेंटमध्ये पत्नी किरण रावसोबत पोहोचला आमिर, स्टायलिश लूकमध्ये दिसला करण जोहर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानी आणि उद्योगपती अजय पीरामलचा मुलगा आनंदची एंगेजमेंट इटलीच्या लेक कोमोमध्ये झाली. साखरपुड्याचे फंक्शन 23 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत. या सेरेमनीमध्ये अनेक बॉलिवूड सेलेब्स सहभागी झाले. तीन दिवसांच्या या सेरेमनीमधील दूस-या दिवसाचे काही फोटोज समोर आले आहेत. फंक्शनमध्ये आमिर खान पत्नी किरण रावसोबत दिसला. यावेळी आमिर ब्लॅक कलरच्या शेरवानी आणि व्हाइट पजामामध्ये दिसला. तर किरण ग्रीन कलरच्या सलवार सूटमध्ये दिसली. 

 

स्टायलिश लूकमध्ये दिसला करण जोहर 
- एंगेजमेंट पार्टीमध्ये करण जोहर गोल्डन आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाला. तर जूही चावला लाइट गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाली. चूही चावला लाइट गोल्डन कलरच्या लहेंग्यामध्ये गॉर्जियस दिसली.
- वृत्तांनुसार प्रियांका, निक, अनिल कपूर, मनीष मल्होत्रा आणि जान्हवी कपूरसोबतच, सोनम कपूर, प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा आणि भाऊ सिध्दार्थ, जान्हवीची बहीण खुशी कपूरसोबत अनेक बॉलिवूड सेलेब्स पार्टीमध्ये सहभागी झाले होते. 

 

मुलीचा हात पकडून सेरेमनीमध्ये पोहोचले होते मुकेश अंबानी 
मुकेश अंबानी इंगेजमेंट पार्टीमध्ये मुलगी ईशा अंबानीचा हात पकडून दिसले. यावेळी ईशाने गोल्डन कलरचा गाउन घातला होता. तर मुकेश अंबानी व्हाइट कलरच्या सूटमध्ये दिसले. 

तीन दिवसांचा उत्सव 
ईशा अंबानी आणि आनंद पीरामलचा साखरपुड्याचा उत्सव इटलीतील लेक कोमोमध्ये 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरपर्यंत चालेल. रिपोर्ट्सनुसार साखरपुडा 21 सप्टेंबरला झाला आहे. 22 सप्टेंबरला अंबानी कुटूंबाने पाहूण्यांसाठी खास इटेलियन फूडची व्यवस्था केली होती. यासोबतच रात्री डिनर आणि डान्स पार्टीही झाली. 23 सप्टेंबरलाही सेलिब्रिटी गेस्टसाठी खास पार्टीचे आयोजन केले आहे. ही पार्टी दुओमो दि कोमो आणि टीस्ट्रो सोशिएल कोमो (Duomo di Como & Teatro Sociale Como)येथे होणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...