आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या आवडत्या ठिकाणी न्यू इयर सेलिब्रेशन केले. नववर्षाच्या स्वागतासाठी कुणी सिडनी, स्वित्झर्लंड, लडंन तर कुणी बालीची निवड केली होती. अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत सिडनीत नववर्षाचे स्वागत केले. सिडनीच्या रस्त्यांवर दोघे रोमँटिक अंदाजात दिसले. यावेळी अनुष्का सिल्व्हर कलरच्या बॅकलेस गाऊनमध्ये दिसली. तर विराट व्हाइट ड्रेसमध्ये दिसला. सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबत बालीमध्ये जल्लोष केला. तिने इंस्टाग्रामवर न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहे. सोनमने नववर्षाच्या शुभेच्छा देत 2018 हे वर्ष चांगले राहिल्याचे सांगितले. गेल्यावर्षी तिचे 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' आणि 'संजू' हे चित्रपट रिलीज झाले होते.
आलिया भटने कपूर कुटुंबीयांसोबत साजरा केला आनंद...
- आलिया भटने लंडनमध्ये कपूर फॅमिलीसोबत न्यू इयर सेलिब्रेट केले. ऋषी कपूर सध्या लंडनमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत लंडनमध्ये आहे. कपूर फॅमिलीसोबत आलियाने वाइन शेअर केली. समोर आलेल्या फोटोत ऋषी कपूर मात्र अतिशय कमजोर दिसत आहेत.
- करीना कपूरने पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाचे स्वागत केले. समोर आलेल्या फोटोत करीना ब्लू कलरच्या गाऊनमध्ये अतिशय गॉर्जिअस दिसतेय.
- जॅकलीन फर्नांडिसने दुबईत कुटुंबीयांसोबत आनंद साजरा केला. अजय देवगणसुद्धा कुटुंबासोबत सध्या परदेशी आहे.
- कंगना रनोटने मनालीच्या घरी कुटुंबीयांसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, सेलेब्सचे न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.