आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 वर्षांचा झाला तुषार कपूर, आजपर्यंत दिला नाही एकही हिट चित्रपट, जाणून घेऊया अशाच काही स्टारकिड्सविषयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुषार कपूर 42 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 20 नोव्हेंबर 1976 ला मुंबईत झाला आहे. जंपिंग जॅक म्हणून इंडस्ट्रीत एक काळ गाजवलेले स्टार जितेंद्र यांचा तुषार मुलगा आहे. तुषारने आतापर्यंत अनेक फिल्ममध्ये काम केले आहे, मात्र त्याच्या एकट्याच्या बळावर एखादी हिट फिल्म दिली असे झालेले नाही. इंडस्ट्रीमध्ये तुषार हा एकमेव असा स्टार किड नाही, तर अनेक आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुमची अशाच काही स्टार किड्ससोबत भेट घडवून आणणार आहोत... 

 

तुषार कपूर 
तुषारने 2001 मध्ये 'मुझे कुछ कहना है'मधून डेब्यू केले होते. या फिल्ममध्ये करीना कपूर आणि रिंकी खन्ना त्याच्यासोबत होती. याशिवाय तुषारने गायब (2004) , 'खाकी' (2004), 'क्या कूल है हम' (2005), 'क्या सुपर कूल है हम' (2012) सारख्या अनेक फिल्ममध्ये काम केले आहे. त्याने डायरेक्टर रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमध्येही काम केले आहे. या सीरिजच्या सर्व फिल्म हिट ठरल्या आहेत, मात्र याचे श्रेय कोणत्याही एका कलाकाराला देता येत नाही, कारण त्या मल्टीस्टारर फिल्म होत्या. 

 

तनिषा मुखर्जी 
अॅक्ट्रेस तनुजाची मुलगी आणि सुपरस्टार काजोलची बहिण तनिषा मुखर्जी कधी आली आणि कधी गेली हे कळले देखील नाही. तनिषाने 'श्श..' (2003) मधून डेब्यू केले होते. याशिवाय 'नील अँड निक्की' (2005), 'सरकार' (2005), 'सरकार राज' (2008), 'तुम मिलो तो सही' (2010) सारख्या फिल्ममध्ये तिने काम केले होते. तिचा शेवटचा चित्रपट 2016 मध्ये 'आन' आला होता. तनिषा स्वतःच्या बळावर एकही हिट फिल्म देऊ शकली नाही.


पुढील स्लाइडमध्ये विवेक ओबेरॉय ते ईशा देओल....

 

बातम्या आणखी आहेत...