आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीला सोडून गर्लफ्रेंडसोबत रोमांस करत आहेत हे 4 बॉलीवूड अॅक्टर्स, एकाचा झालेला नाही घटस्फोट तर एकजण करत आहे स्वतःच्या वयापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीला डेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेनमेंट डेस्क : लग्न, घटस्फोट आणि अफेयर..... या गोष्टी बॉलीवूडसाठी काही नवीन नाहीत. या सिनेकलाकरांसाठी घटस्फोट घेणे आणि पुन्हा दुसरा संसार थाटणे ही सामान्य बाब झाली आहे. वॅलेंटाइन आठवड्यानिमित्त आम्ही तुम्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगत आहोत, जे आपल्या पत्नीला सोडून प्रेयसींना डेट करत आहेत. यातील काही तर घटस्फोट न घेताच गर्लफ्रेंडला डेट करत आहेत. 


> अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया हे लग्नाच्या 20 वर्षांनंतर वेगळे झाले आहेत. दोघांनीही स्टेटमेंट जारी करत सांगितले होते की, आता आपापला मार्गावर जायला हवे. त्यांना सांगितले होते की, दोघे घटस्फोटानंतरही चांगले मित्र राहतील आणि गरज पडल्यास एकमेकांना मदत करतील. ते त्यांच्या मुली महिका आणि मायरासाठी सदैव सोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिलेला नाही. पण अर्जुन आफ्रिकन मॉडल गॅब्रिएला डेमेट्रिएडसला डेट करत आहे. ते दोघेही अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसतात. 


> फरहान अख्तरने लग्नाच्या 17 वर्षांनंतर पत्नी अधुनाला घटस्फोट दिला. श्रद्धा कपूर फरहानच्या आयुष्यात आल्यापासून त्याचा बायकोसोबत वाद होत होता. पण हा वाद पुढे वाढतच गेला आणि अखेर दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे असे सांगितले जाते. दोघांना शाक्या आणि अकीरा या दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर दोन्ही मुली आईकडेच राहतात. फरहान सध्या शिबानी दांडेकरला डेट करत आहे. दोघे सुट्यांचा आनंद घेत असलेले फोटोज सोशल मीडियावर व्हायरला झाले आहेत. 


> अरबाज आणि मलायका अरोरा हे दोघेही लग्नाच्या 16 वर्षांनंतर 2017 मध्ये वेगळे झाले. घटस्फोटानंतर अरबाज विदेशी गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत आहे. तर मलायका स्वतःपेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरला डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मिळालेल्या बातम्यांनुसर अरबाज लवकरच गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. पण मलायकाने मात्र अर्जुनसोबत असलेल्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. 


> फिल्ममेकर अनुराग कश्यपने 2011 मध्ये अभिनेत्री कल्की कोचलिनसोबत विवाह केला होता. पण चार वर्षांतच दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर अनुरागने स्वतःच्या वयापेक्षा निम्मे वय असलेली गर्लफ्रेंड शुभाना शेट्टीला डेट करण्यास सुरुवात केली होती.

बातम्या आणखी आहेत...