आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूडचा बालकलाकार शिवलेख सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू; ससुराल सिमर का, बालवीर इत्यादी मालिकांमध्ये केले होते काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - बॉलीवूड आणि टीव्हीचा प्रसिद्ध बालकलाकार शिवलेख सिंग ऊर्फ अनु सिंगचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. रायपूरजवळील धरसीवां गावाजवळ हा अपघात घडला. शिवलेख आपल्या परिवारासोबत कारने जात असताना समोरून येणाऱ्या ट्रेलरसोबत जोरदार धडक झाली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला. यावेळी कारमध्ये शिवलेखचे वडील शिवेंद्र सिंग, नवीन सिंग, आई लेखना सिंग सोबत होते. शिवलेखच्या आई आणि वडिलांनी गंभीर अवस्थेत नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


शिवलेखने लोकप्रिय टीव्ही मालिका 'ससुराल सिमर का'सह अनेक मालिकांतून आपली ओळख बनवली. तो जांजगीरच्या नरियरा गावातील रहिवासी होता. शिवलेखने झी-टीव्हीच्या 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज', सोनी टीव्हीच्या 'संकटमोचन हनुमान', कलर्स टीव्हीच्या 'ससुराल सिमर का', सब टीव्हीवरील 'खिडकी', 'बालवीर', 'श्रीमानजी श्रीमतीजी', बिग मॅजिक वरील 'अकबर-बीरबल' इत्यादी मालिकांमध्ये काम केले आहे. तो नुकताच रेमो डिसुझाच्या आगामी चित्रपटात काम करत होता. या चित्रपटाचे 90% चित्रीकरण पूर्ण झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...