आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट किंवा जाहिराती न करताही कोट्यवधींच्या संपत्तीची मालकिण आहे राखी सावंत, फ्लॅट आणि बंगल्याची किंमत आहे 11 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत तिच्या बिनधास्त बोलसाठी प्रसिद्ध आहे. मीडियाचे लक्ष स्वतःकडे कसे खेचावे हे तिला चांगलेच ठाऊक आहे. प्रत्येक गोष्टीत स्वतःचे मत मांडणारी राखी सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. विशेष म्हणजे चित्रपट किंवा जाहिराती न  करताही तिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. तब्बल 15 कोटींच्या संपत्तीची राखी मालकिण आहे. राखीचे वडील आनंद सावंत मुुंबई पोलिस विभागात कॉन्स्टेबल होते. आई जयासोबत राखी मुंबईत वास्तव्याला आहे. 


तनुश्रीविरोधात 50 कोटींचा खटला... 
- तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकरांवर लैंगिक छळाचा आरोप लावला आहे. यावरुन राखीने तनुश्रीला खडे बोल सुनावले. यामुळे नाराज होऊन तनुश्रीने राखीवर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. त्याचे प्रतिउत्तर देताना राखीने तनुश्रीला 50 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची धमकी दिली आहे.

 

15 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे राखी...

इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या आकेडवारीनुसार, राखी 15 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. तिच्याजवळ मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला असून त्याची एकुण किंमत 11 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याजवळ 21.6 लाख रुपयांची  फोर्ड एंडेवर कार आहे. राखी ही सर्व कमाई स्टेज परफॉर्मन्सच्या माध्यमातून करत असते. 


1997 मध्ये सुरु केले होते राखीने करिअर...
- राखीने 1997 मध्ये आलेल्या 'अग्निचक्र' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. अनेक चित्रपटांमध्ये तिने हिट आयटम नंबर्स दिले आहेत. 
- राखीने बिग बॉसशिवाय 'नच बलिए 3', 'ये है जलवा', 'अरे दीवानों मुझे पहचानों', 'राखी का स्वयंवर' या रिअॅलिटी शोजमध्ये काम केले आहे. 
- 'राखी का स्वयंवर' या रिअॅलिटी शोमध्ये राखीने टोरंटोच्या एका स्पर्धकासोबत साखरपुडा केला होता, पण काही महिन्यांनी तिने ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले होते.

 

स्वतःला सांगितले होते अशिक्षित... 
राखीने 2014 मध्ये राष्ट्रीय आम पार्टीची स्थापना करुन निवडणूक लढवली होती. टीओआईच्या रिपोर्टनुसार, यावेळी तिने सादर केलेल्या एफिडेविटमध्ये ठळख अक्षरांमध्ये स्वतःला 'illiterate' असल्याचे सांगितले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...