आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिल्लो राणी...\'च्या गायिकेपासून ते इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार करणार कपिल शर्माच्या लग्नात परफॉर्म, रिसेप्शनमध्ये भरणार दलेर मेहंदीची मैफील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. कॉमेडियन कपिल शर्मा 12 डिसेंबरला जालंधरमध्ये गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत लग्न करतोय. देवीच्या जागरणाने लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. जागरणामध्ये प्रसिध्द सिंगर आणि कपिलची खास मैत्रिण ऋचा शर्मा देवीचे भजन गाऊन पाहूण्यांची मनं जिंकणार आहेत. तर ऋचासोबत पंजाबी भजन गायक मास्टर सलीमही परफॉर्म करणार आहेत. 10 तारखेला जागरणानंतर दूस-या दिवशी चूडा सेरेमनी, मेहंदी आणि कॉकटेल आहे. 

 

लग्नाच्या दिवशी गुरदास आणि रिसेप्शनमध्ये दलेर मेहंदी करणार परफॉर्म
लग्नाच्या दिवशी म्हणजेच 12 डिसेंबरला पंजाबी सिंगर आणि अॅक्टर गुरदास मान गाणे गाणार आहेत. कपिलची होणारी बायको गिन्नी चतरथ गुरदास मानची मोठी चाहती आहे. यानंतर 14 डिसेंबरला अमृतसरमध्ये होणा-या रिसेप्शनमध्ये दलेर मेहंदी आपल्या हिट गाण्यांनी पाहूण्यांचे मनोरंजन करणार आहेत.

 

डिसेंबरच्या अखेरीस मुंबईमध्ये होणार रिसेप्शन 
बॉलिवूड सेलेब्स आणि दूस-या फील्डच्या प्रसिध्द लोकांसाठी कपिलने मुंबईमध्येही एक रिसेप्शन ठेवले आहे. रिपोर्टनुसार हे रिसेप्शन डिसेंबरच्या अखेरीस होईल. पण अजून याची तारीख ठरलेली नाही. 


ऑडिशन दरम्यान झाली होती कपिल गिन्नीची पहिली भेट 
कपिलने सांगितले की, 'मी एचएमव्ही कॉलेज जालंधरमधून शिक्षण घेतले आहे. मी स्कॉलरशिप होल्डर होतो आणि थिएटरचा नॅशनल विनर होतो. 2005 मध्ये मी आयपीजे कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो आणि पॉकेट मनीसाठी प्ले डायरेक्ट करत होतो. मी विद्यार्थ्यांचे ऑडिशन घेण्यासाठी गिन्नीच्या कॉलेजमध्ये गेलो. गिन्नीही ऑडिशनसाठी आली होती आणि येथेच आमची पहिली भेट झाली होती. कपिलने सांगितले की, - त्यावेळी गिन्नी 19 वर्षांची होती आणि मी 24 वर्षांचा होतो. मुलींच्या ऑडिशननंतर मी गिन्नीवर खुप इम्प्रेस झालो. मी तिलाच मुलींचे ऑडिशन घेण्यास सांगितले. रिहर्सल सुरु झाल्यानंतर ती माझ्यासाठी जेवण घेऊन यायची. मला वाटले की, ती हे सर्व मला रिस्पेक्ट देण्यासाठी करतेय.'

 

कॉमेडी शोमध्ये कपिलसोबत दिसली आहे गिन्नी 
गिन्नीचे खरे नाव भवनीत आहे आणि ती मुळची जालंधरची आहे. गिन्नी कपिलसोबत पंजाबी कॉमेडी शो 'हंसबलिए'मध्येही दिसली आहे. याच शोच्या सेटवर दोघांचे अफेअर सुरु झाले असे बोलले जाते. गिन्नीने 2013 मध्ये कपिलसोबतचे रिलेशनशिप ऑफिशिअल केले होते. 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...